चौका (औरंगाबाद) : भारतीय बुद्धिस्ट संघाद्वारे स्थापित महाराष्ट्र बुद्धिस्ट सभागृहाचे अधिवेशन नुकतेच औरंगाबाद तालुक्यातील चौका येथील मुख्यालयात पार पडले. राज्यस्तरावरील अधिवेशनात विविध ठराव घेण्यासोबतच विविध प्रश्न सोडविण्याबाबत चर्चा झाली. १५ फेब्रुवारी २०१५ रोजी भारतीय बुद्धिस्ट संघाद्वारे महाराष्ट्रातील सर्व बुद्ध धम्मीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र बुद्धिस्ट सभागृहाची स्थापना करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रभर सर्व बुद्ध धम्मीयांची सभासद यादी करून मतदानाद्वारे निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यानुसार राज्यातील प्रत्येक शाखेच्या माध्यमातून उत्सुक असणाऱ्यांनी सभासदत्व घेतले. त्यातून तालुका प्रमुख निवडले गेले. तालुका प्रमुखांमधून जिल्हा प्रमुख आणि त्यानंतर विभागीय प्रमुख निवडले गेले. समाजातील डॉक्टर, इंजिनिअर, वकील, कामगार, शेतकरी, बुद्ध विहाराचे प्रमुख, सरकारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, भन्ते, महिला पदवीधर, उद्योजक यांचा समावेश करण्यात आला व त्यामधून महाराष्ट्राची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राज्याचे अध्यक्ष म्हणून राजेश गवई यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत सर्जेराव वडनगेकर (शासकीय कर्मचारी), माणिक कुरणे (बुद्धिस्ट पार्टी), संदीप भोसले (इंजिनिअर संघटना), गणेश घोडके (पदवीधर), आत्माराम इंदवे (डॉक्टर), अरविंद साळवे (बीआयएस), राजेश गवई (भारतीय बुद्धिस्ट संघ), माधुरी गायकवाड (बुद्धिस्ट सेक्युरिटी फोर्स), अजित गायकवाड (विहार अध्यक्ष), प्रशांत वासनिक (बुद्ध धम्म प्रचारक), महेश शिवशरण (भारतीय बुद्धिस्ट संघ), दीपाली वाघमारे (उद्योजक), स्नेहलता कुरणे (महिला बुद्धिस्ट संघ), प्रकाश ओहळ (कामगार संघटना), सुभाष सामंत (पत्रकार) यांची सभापती म्हणून निवड झाली. (प्रतिनिधी)चौका (औरंगाबाद) : भारतीय बुद्धिस्ट संघाद्वारे स्थापित महाराष्ट्र बुद्धिस्ट सभागृहाचे अधिवेशन नुकतेच औरंगाबाद तालुक्यातील चौका येथील मुख्यालयात पार पडले. राज्यस्तरावरील अधिवेशनात विविध ठराव घेण्यासोबतच विविध प्रश्न सोडविण्याबाबत चर्चा झाली. १५ फेब्रुवारी २०१५ रोजी भारतीय बुद्धिस्ट संघाद्वारे महाराष्ट्रातील सर्व बुद्ध धम्मीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र बुद्धिस्ट सभागृहाची स्थापना करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रभर सर्व बुद्ध धम्मीयांची सभासद यादी करून मतदानाद्वारे निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यानुसार राज्यातील प्रत्येक शाखेच्या माध्यमातून उत्सुक असणाऱ्यांनी सभासदत्व घेतले. त्यातून तालुका प्रमुख निवडले गेले. तालुका प्रमुखांमधून जिल्हा प्रमुख आणि त्यानंतर विभागीय प्रमुख निवडले गेले. समाजातील डॉक्टर, इंजिनिअर, वकील, कामगार, शेतकरी, बुद्ध विहाराचे प्रमुख, सरकारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, भन्ते, महिला पदवीधर, उद्योजक यांचा समावेश करण्यात आला व त्यामधून महाराष्ट्राची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राज्याचे अध्यक्ष म्हणून राजेश गवई यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत सर्जेराव वडनगेकर (शासकीय कर्मचारी), माणिक कुरणे (बुद्धिस्ट पार्टी), संदीप भोसले (इंजिनिअर संघटना), गणेश घोडके (पदवीधर), आत्माराम इंदवे (डॉक्टर), अरविंद साळवे (बीआयएस), राजेश गवई (भारतीय बुद्धिस्ट संघ), माधुरी गायकवाड (बुद्धिस्ट सेक्युरिटी फोर्स), अजित गायकवाड (विहार अध्यक्ष), प्रशांत वासनिक (बुद्ध धम्म प्रचारक), महेश शिवशरण (भारतीय बुद्धिस्ट संघ), दीपाली वाघमारे (उद्योजक), स्नेहलता कुरणे (महिला बुद्धिस्ट संघ), प्रकाश ओहळ (कामगार संघटना), सुभाष सामंत (पत्रकार) यांची सभापती म्हणून निवड झाली. (प्रतिनिधी)
महाराष्ट्र बुद्धिस्ट सभागृहाचे औरंगाबादेत प्रथम अधिवेशन
By admin | Published: July 25, 2015 1:14 AM