नवी दिल्ली : देशातील सर्व आयआयटींमधील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणारी जॉइंट एन्ट्रन्स परीक्षेचे आयोजन (JEE Main) आता वर्षातून चार वेळा केले जाणार आहे. जेईई मेन परीक्षेचे पहिले सत्र फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. तर दुसरे सत्र मार्च, तिसरे एप्रिल आणि चौथे सत्र मे महिन्यात होणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटरवरून दिली आहे.
जेईई मेन परीक्षेचे पहिले सत्र फेब्रुवारी महिन्यात, दुसरे सत्र मार्च, तिसरे एप्रिल आणि चौथे सत्र मे महिन्यात होणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत ही परीक्षा होईल. फेब्रुवारीत होणारी परीक्षा २३ ते २६ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत होणार आहे, अशी माहिती डॉ. रमेश पोखरियाल यांनी दिली. याचबरोबर, ज्या पद्धतीने जेईई परीक्षेचे आयोजन होत आहे, ते पाहता ही जगातली सर्वात मोठी परीक्षा व्हावी, अशी अपेक्षा रमेश पोखरियाल यांनी व्यक्त केली.
दरम्यान, नॅशनल टेस्टिंग एजन्सी जेईई मेन 2021 चे ब्राउशर (JEE Main 2021 Exam) जारी करण्यात आले आहे. विद्यार्थी आजपासूनच परिक्षेसाठी अर्ज करु शकतील. तुम्ही jeemain.nta.nic.in वर ऑनलाईन अर्ज करु शकता. जेईई मेन 2021 साठी ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 15 जानेवारी आहे.