नवी दिल्ली : माणसाला अंतराळात नेण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भारताच्या इस्रो या अवकाश संशोधन संस्थेने आयोजिलेल्या गगनयान या मोहिमेसाठी पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून चाचणी उड्डाणे सुरू होणार आहेत.
गगनयान मोहिमेचा एक भाग म्हणून अंतराळवीरांना तीन दिवस पृथ्वीच्या कक्षेत घेऊन जाणाऱ्या क्रू मॉड्यूलच्या चाचणीसाठी चिनूक हेलिकॉप्टर, ली-१७ ग्लोबमास्टर ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट तैनात करण्याची इस्रोची योजना आहे. ही माहिती इस्रोच्या ह्यूमन स्पेस फ्लाईट सेटरचे संचालक आर. उमामहेश्वरन यांनी दिली आहे.
पुढील वर्षी डिसेंबर महिन्यात मानवरहित अंतराळयान अवकाशात झेपावेल, त्याआधी इस्रो १७ वेगवेगळ्या चाचण्या करणार आहे. असे उमामहेश्वरन यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात सांगितले.
स्वबळावर कामगिरी करण्याची इच्छाआतापर्यंत भारतासह विविध देशाच्या अंतराळवीरांनी अवकाश केलेली आहे. मात्र केवळ अमेरिका, चीन, रशिया या तीन देशांनीच स्वतःच्या रॉकेटच्या साहाय्याने अंतराळवीरांना अवकाशात पाठविले आहे. आता या पंक्तीत भारतालाही प्रवेश करण्याची इच्छा आहे. त्यामुळेच गगनयान मोहिमेद्वारे भारत स्वबळावर देशाच्या नागरिकाला अवकाशात पाठविणार आहे.