शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

आधी डॉक्टर चाखणार, मग पाहुणे जेवणार..! 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 5:55 AM

डॉक्टरांवर जी-२० प्रतिनिधींचे जेवण तपासण्याची जबाबदारी

- संतोष आंधळेलाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या बैठकांना मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. यासाठी जी-२० सदस्य देशांच्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती मुंबईत आल्या आहेत. हे सर्व प्रतिनिधी विविध ठिकाणी राहणार आहेत, बैठका घेणार  आहेत. तेथील अन्नाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणजेच डॉक्टरांवर असणार आहे. एमबीबीएससारखे उच्च शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना गिनिपिग करण्याचा प्रकार बंद करण्याची मागणी होत आहे. 

संबंधित ब्रिटिशकालीन नियमांमध्ये बदल करून डॉक्टरांच्या जागी अन्न आणि औषध प्रशासन विभागातील तज्ज्ञांची नेमणूक करण्याबाबत सूर व्यक्त केला जात आहे. हे प्रकार थांबायला हवेत, याबाबत वैद्यकीय क्षेत्रातून मोठा रोष व्यक्त केला जात आहे. परदेशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येतात. तेव्हा त्यांच्या  वैद्यकीय सुविधांसाठी वरिष्ठ डॉक्टरांचे पथक,  ॲम्ब्युलन्ससह तैनात केले जाते. एखादा वैद्यकीय आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास त्यासाठी पथकातील डॉक्टरांनी काम करणे अपेक्षित असते. यासाठी राज्य शासनाच्या रुग्णालयातील डॉक्टरांची नेमणूक करण्यात येते. मात्र, याव्यतिरिक्त निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात येते. त्यांचे काम महत्त्वाच्या व्यक्तींना दिले जाणारे अन्न तपासण्याचे असते. या विशेष कामासाठी १५ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये जे. जे., कामा, जी. टी. आणि सेंट जॉर्ज रुग्णालयातील डॉक्टरांचा समावेश आहे. या डॉक्टरांना पाहुण्यांचा नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण, तसेच बैठकीमध्ये दिल्या जाणाऱ्या खाण्याच्या पदार्थांची चव चाखावी लागणार आहे. 

 कसे करतात काम?ज्या हॉटेलमध्ये पाहुण्यांसाठी जेवण बनविले जाणार आहे, तेथे निवासी वैद्यकीय अधिकारी आणि दोन पोलिस पाहुण्यांना देणार असलेले अन्न खाऊन बघतात. त्यानंतर निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अन्नपदार्थ खाण्यायोग्य आहे, असे सांगितल्यानंतर थोड्या वेळानंतर ते पाहुण्यांना दिले जाते. ...मग अन्न व औषध प्रशासन कशासाठी? एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार,  या विषयावर काही वर्षांपूर्वीही गदारोळ झाला होता. सगळ्यांना मान्य आहे की, अशा पद्धतीने डॉक्टरांना जेवणाची तपासणी करायला लावणे चुकीचे आहे.  मात्र, हे ब्रिटिशकालीन नियम बदलायची तसदी मात्र कुणी घेत नाही. कुणीही डॉक्टर उघडपणे या विषयावर बोलण्यास कचरतात.  खाद्यपदार्थ तपासणीचे काम अन्न आणि औषध प्रशासनातील तज्ज्ञ रसायनांचा आधार घेऊन करू शकतात. वैद्यकीय सुविधांसाठी वैद्यकीय पथकाची नेमणूक गरजेची आहे. जेवण तपासणीसाठी डॉक्टर योग्य नाही.