नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतीलपोलिसांनीच रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केल्याने मंगळवारी अनेक पोलीस ठाण्यांमध्ये, तसेच रस्त्यांवर गस्ती घालणाऱ्या पोलिसांची संख्या कमी दिसत होती. असंख्य आंदोलने अनुभवणाºया दिल्लीकरांना पहिल्यांदाच पोलिसांचे आंदोलन पाहायला मिळाले.
या आंदोलनामुळे पोलीस आयुक्त अमूल्य पटनाईकही अस्वस्थ झाले. शिस्तबद्ध दलाप्रमाणे आपले वर्तन असावे. सरकार आणि समाजाला आपल्याकडून कायदा सुव्यवस्थेची अपेक्षा आहे. कायदा सुव्यवस्था हीच आपली जबाबदारी आहे. गेले काही दिवस आपली परीक्षा पाहणारे ठरले. न्यायालयीन चौकशीची प्रक्रिया सुरू असून प्रत्येकाने त्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. तीस हजारी न्यायालयाच्या परिसरात पोलीस-वकील यांच्यातील वादाचा अहवाल मंगळवारी दिल्ली पोलिसांनी गृहमंत्रालयाकडे सादर केला. शनिवारी घडलेल्या या घटनेची विस्तृत माहिती या अहवालात देण्यात आल्याचे गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारनंतर सोमवारपर्यंत घडलेल्या इतर कोणत्याही घडामोडींचा यात उल्लेख करण्यात आलेला नसल्याचेही अधिकाºयांनी स्पष्ट केले.
साकेत न्यायालयाच्या परिसरात सोमवारी वकिलांनी पोलिसाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी साकेत पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. व्हायरल व्हिडिओमध्ये वकील पोलिसाला मारहाण करीत असल्याचे दिसत आहे. पोलिसांच्या आंदोलनावर वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिल्ली पोलिसांचे माजी जनसंपर्क अधिकारी मधुर वर्मा, माजी उपायुक्त अस्लम खान, जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस.पी. वैद्य, दिल्ली पोलीस दलातील माजी प्रवक्ते दीपेंद्र पाठक यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांचा निषेध केला आहे. दरम्यान, व्यवसायाची बदनामी करणाºया वकिलांचा शोध घेण्याचे आवाहन करणारे पत्र बार कौन्सिल आॅफ इंडियाने बार संघटनांना पाठवले आहे. कौन्सिलचे अध्यक्ष मननकुमार मिश्रा म्हणाले की, बार संघटनांची निष्क्रियता अशा वकिलांचे मनोबल वाढवते. त्यामुळे त्याचा परिणाम उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानात होतो.गृहमंत्री कुठे आहेत? -काँग्रेसच्स्वातंत्र्यानंतरच्या ७२ वर्षांच्या इतिहासात दिल्लीत पोलिसांना आंदोलन करावे लागले नाही. मात्र, भाजपच्या नव्या भारतात पोलिसांचे आंदोलन म्हणजे देशाची व्यवस्थाच कोलमडल्याचेच लक्षण आहे, अशी टीका काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केली.च्केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कुठे आहेत, असा सवालही त्यांनी केला. पोलिसांनाच आंदोलन करावे लागत असेल तर सामान्य जनतेने काय करावे, असा प्रश्नही त्यांनी केला.