देशभरातील काेराेनाच्या नव्या रुग्णसंख्येत जूननंतर माेठी घट झाली आहे. गेल्या २४ तासामध्ये १२ हजार ५८४ नव्या रुग्णांची नाेंद झाली आहे. तसेच १६७ काेराेना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काेराेना रुग्णांच्या मृत्यूमध्येही माेठी घट नाेंदविण्यात आली आहे.
१ काेटी ४ लाख ७९ हजार १७९
वर देशातील काेराेना रुग्णसंख्या पाेहाेचली असून, नव्या रुग्णांचा आकडा गेल्या वर्षी १७ जूननंतर प्रथमच १३ हजाराच्या खाली आला आहे.
१०,९७४ नव्या रुग्णांची नाेंद १६ जूनला झाली हाेती
१२,८८१ नवे रुग्ण आढळून १७ जूनला आले हाेते.
२९ मेनंतर काेराेनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा प्रथमच २००च्या खाली आला आहे. २९ मे राेजी २६९ रुग्णांचा मृत्यू झाला हाेता. आतापर्यंत एकूण १ लाख ५१ हजार ३२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासामध्ये १८ हजार ३८५ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या १ काेटी १ लाख ११ हजार २९४ एवढी झाली असून, आता केवळ २ लाख १६ हजार ५५८ सक्रिय रुग्ण राहिले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट आता ९६.४९ टक्क्यांवर पाेहाेचला आहे.