लखनऊ : भारतातील पहिली खासगी ट्रेन तेजस (Tejas Express) शनिवार-रविवारी तीन फेऱ्यांमध्ये एक ते अडीच तास उशिरा पोहोचली. त्यामुळे आयआरसीटीसीला (IRCTC) पहिल्यांदाच २१३५ प्रवाशांना जवळपास साडेचार लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
दरम्यान, शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर ऑटोमेटिक सिग्नल फेल झाल्याने तेजस एक्स्प्रेस जवळपास अडीच तास उशिरा प्लॅटफॉर्मवर पोहोचली. त्यानंतर परत जाण्यासाठी सुद्धा ट्रेन लखनऊसाठी इतक्याच उशिरा पोहोचली. रविवारी सुद्धा लखनऊ-दिल्ली तेजसला जवळपास १ तास उशीर झाला.
विशेष म्हणजे, उशीर झाल्यास प्रवाशांना नुकसान भरपाई देणारी तेजस एक्सप्रेस ही देशातील पहिली ट्रेन आहे. नियमानुसार, ट्रेन एक तास उशिर झाल्यास १०० रुपये आणि दोन तास किंवा त्यापेक्षा अधिक उशिर झाल्यास २५० रुपये नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे.
आयआरसीटीसीला शनिवारी तेजसच्या दोन फेऱ्यांसाठी १५७४ प्रवाशांसाठी प्रति व्यक्ती २५० रुपये यानुसार एकूण ३ लाख ९३ हजार ५०० रुपये द्यावे लागणार आहे. तर रविवारी पहिल्या फेरीच्या ५६१ प्रवाशांना एक तासाच्या उशिरासाठी १००-१०० रुपये याप्रमाणे ५६१०० रुपये नुकसान भरपाई द्यावी लागेल.
एकूण २१३५ प्रवाशांना ४४९६०० रुपये नुकसान भरपाईआयआरसीटीसीचे मुख्य प्रादेशिक व्यवस्थापक अजित सिन्हा म्हणाले की, १५७४ प्रवाशांच्या दाव्यावर (क्लेम) ३ लाख ९३ हजार ५०० रुपये परत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. रविवारी लखनऊपासून नवी दिल्ली एक तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यामुळे ५६१ प्रवाशांना प्रत्येकी १०० रुपये मिळतील. अशा प्रकारे एकूण २१३५ प्रवाशांना ४४९६०० रुपये नुकसान भरपाई मिळेल.
दोन वर्षांत पहिल्यांदाच अडीच तास उशीरविमान उड्डाणासारख्या सुविधा असलेल्या तेजस एक्स्प्रेसची सुरुवात ४ ऑगस्ट २०१९ रोजी करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांत या ट्रेनबद्दल पाच तक्रारी आल्या आहेत, जेव्हा ट्रेनला एक तासापेक्षा कमी उशीर झाला होता. दोन वर्षांत पहिल्यांदाच ट्रेन एक तासाहून अधिक उशिरा पोहोचली.