पुद्दुचेरी: काँग्रेस नेते राहुल गांधींकडे (Congress Leader Rahul Gandhi) मदत न मिळाल्याची तक्रार करणाऱ्या महिलेच्या शब्दांचं चुकीचं भाषांतर केल्यानं भारतीय जनता पक्षानं पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चक्रीवादळादरम्यान मदत न मिळाल्याची तक्रार करणाऱ्या महिलेचं म्हणणं मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींपर्यंत व्यवस्थित पोहोचवलं नाही. उलट संबंधित महिला आपलं कौतुक करत असल्याचं नारायणसामी यांनी राहुल यांना सांगितलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.पुडुचेरीत राहुल गांधींनी केलं राजीव गांधींच्या मारेकऱ्यांवर वक्तव्य; म्हणाले, "मी त्यांना माफ..."पुद्दुचेरीत लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी दोन दिवसांच्या पुद्दुचेरी दौऱ्यावर आहेत. काल राहुल गांधींनी मच्छिमारांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री नारायणसामी राहुल गांधींसोबत होते. यावेळी सोलाई नगरच्या एका मच्छिमार महिलेनं नारायणसामी यांची तक्रार राहुल यांच्याकडे केली. आमच्या भागाला चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. मात्र तरीही मुख्यमंत्री फिरकले नाहीत, अशी तक्रार महिलेनं केली.
VIDEO: ...अन् काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यानं राहुल गांधींना उभ्या उभ्या गंडवले; शेकडो लोक पाहतच राहिले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 1:43 PM