पुणे : आयआयटी-जेईई आणि अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षेतील आघाडीची संस्था ‘फिटजी’ने (एफआयआयटीजेईई) जेईई (मेन्स) परीक्षेत पुन्हा एकदा बाजी मारली आहे. फिटजीचा विद्यार्थी मास्टर शुभम श्रीवास्तव याने अखिल भारतीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे.
फिटजी पीसीएमसी केंद्राच्या १४0 पैकी ८३ विद्यार्थ्यांनी २०१९ च्या जेईई (मेन्स) परीक्षेत जबरदस्त यश संपादित केले आहे. हे संस्थेच्या क्लासरूम प्रोग्रामचे विद्यार्थी आहेत. ३५ विद्यार्थ्यांनी ३० हजारांच्या आत रँक मिळविला आहे. फिटजी पीसीएमसी सेंटरचे प्रमुख आर.के. कर्ण यांनी सांगितले की, आमच्या विद्यार्थ्यांचे यश हे संस्थेच्या प्रेरणेचे फलित आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या विचार पद्धतीतच बदल घडवून आणतो, विद्यार्थ्यांचा आयक्यू वाढवतो, तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे विशेष लक्ष देतो. मानसन्मान याचे फिटजीच्या शिक्षकांना कोणतेही कौतुक नाही. विद्यार्थ्यांचे उत्तम प्रयत्न हीच शिक्षकांसाठी खरी गुरुदक्षिणा आहे. स्पर्धा परीक्षेत जागा मर्यादित असतात. यशाची हमी नसते. प्रत्येक विद्यार्थ्यास त्याची सर्वोत्तम कामगिरी करता यावी, यासाठी शिक्षकाचे योगदान मोठे असते. अशा स्थितीत फिटजीच्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना यशाप्रत नेण्याचा निर्धार केला आहे.
‘फिटजी’कडून नवनवीन प्रयोगफिटजी म्हणजे नावीन्य आणि विविध शिक्षण पद्धती आणि प्रक्रियांचे उगमस्थान होय. स्कूल इंटिग्रेटेड प्रोग्राम ही त्यातीलच एक संकल्पना आहे. आपल्या वर्ल्ड अॅण्ड ग्लोबल स्कूलच्या माध्यमातून फिटजी शैक्षणिक परिदृश्य बदलण्यासाठी वचनबद्ध आहे. जेईई (मेन्स) २०१९ मध्ये घवघवीत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे आम्ही मन:पूर्वक अभिनंदन करीत आहोत.