शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
2
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
3
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
4
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
7
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
8
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
14
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
16
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
18
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
19
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
20
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी

औरंगाबादसह पाच विमानतळांचा होणार विकास; जळगाव, पुणे, कोल्हापूर, अकोल्याचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 12:12 AM

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) औरंगाबादसह पाच शहरातील विमानतळांचा विकास करण्याचे ठरवले आहे. यात धावपट्टीचा विस्तार व विमानतळांवर अतिरिक्त सुविधा यांचा समावेश आहे. अकोला व औरंगाबाद विमानतळांच्या विस्तारासाठी अनुक्रमे ८४.२६ एकर आणि १८२ एकर जमिनीची आवश्यकता आहे.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) औरंगाबादसह पाच शहरातील विमानतळांचा विकास करण्याचे ठरवले आहे. यात धावपट्टीचा विस्तार व विमानतळांवर अतिरिक्त सुविधा यांचा समावेश आहे. अकोला व औरंगाबाद विमानतळांच्या विस्तारासाठी अनुक्रमे ८४.२६ एकर आणि १८२ एकर जमिनीची आवश्यकता आहे.प्राधिकरणाने कोल्हापूर विमानतळासाठी स्टेटमेंट आॅफ वर्क (एसओडब्ल्यू) जारी केले असून, या विमानतळावर विकास कामे करण्यात येणार आहेत. पुणे विमानतळावर इंटिग्रेटेड टर्मिनल बिल्डिंगसाठी व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती केली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने महाराष्ट्रातील अनेक विमानतळांचा विकास करण्याचे ठरवले आहे. त्यात रनवेचा विस्तार अन्य विकास कामांचा समावेश आहे.औरंगाबाद विमानतळाच्या रनवेचा २८३५ मीटरवरून ३६६० मीटरपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे, तर अकोला विमानतळाच्या रनवेचा १२१९ मीटरवरून १४०० मीटरपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. नव्या तंत्रज्ञानाचे ब्लॉक कम कंट्रोल टॉवर, ई अँड एम वर्कशॉप, अग्निशमन दल व संबंधित इमारती यांचा या यांता समावेश आहे.अन्य सोयी या असतीलजळगाव विमातळाच्या रनवेचा सध्या १७०० मीटरचा असून, तो ३२६९ मीटर करण्यात येईल. कोल्हापूर विमानळाच्या रनवेचा १३७० मीटरवरुन २३०० मीटरपर्यंत विस्तार केला जाईल. याशिवाय नवी टर्मिनल इमारत, एटीसी कम टेक्निकल ब्लॉक कम फायर स्टेशन, डीव्हीओआर, रात्रीच्या लँडिंगची सुविधा आणि रनवेच्या दोन्ही टोकास साधी सुलभ प्रकाश योजना यांचा समावेश आहे. पुणे विमानतळावर नवीन इंटिग्रेटेड टर्मिनल बिल्डिंग, एअरबस ३२०/३२१ विमानांसाठी पािर्कंग आदी सुविधांचा समावेश आहे.

टॅग्स :Airportविमानतळ