ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - भारताने पाकिस्तानबरोबर झालेल्या सिंधू पाणी वाटप करारातील आपल्या हक्काचे पाणी वापरण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर चीनने तिबेटमधून वाहणा-या यारलंग झांगबो म्हणजे ब्रम्हपुत्र नदीवर धरण बांधणार असल्याचे म्हटले आहे. चीनचा तिबेटमधील हा सर्वात महागडा प्रकल्प असून या धरणामुळे भारताला काही धोके आहेत.
- चीनकडून तिबेटमध्ये बांधले जाणारे हे धरण अनेक कारणांसाठी भारताची चिंता वाढवणारे आहे. या धरणामुळे पाणी अडवले जाणार असून, भारताचा चीनबरोबर त्यासंबंधी कोणताही करार झालेला नाही.
- ब्रम्हपुत्र नदीवरील धरणामुळे अरुणाचलप्रदेशवरील आपला दावा अधिक बळकट होईल, असे चीनला वाटते.
- तिबेटमधील धरणामुळे भारतातील नद्यांचा प्रवाह कमी होण्याची चिंता भारताला वाटते.
- युद्ध किंवा आणीबाणीच्या प्रसंगी चीन धरण, कालवे आणि सिंचन प्रकल्पाचा अस्त्रासारखा वापर करु शकतो.
- तिबेटवरील धरणा प्रकल्पांमुळे भारताच्या ईशान्येकडील राज्ये आसाम, मणिपूर, अरुणाचलप्रदेश या भागांना धोका आहे. इथे पूराचे प्रमाण वाढू शकते किंवा पाण्याचा प्रवाह कमी होऊ शकतो.