शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

जिल्ह्यातील ५ ग्रामपंचायती काँग्रेस, राष्ट्रवादीकडे

By admin | Published: April 19, 2016 12:45 AM

गोलटगाव : औरंगाबाद पंचायत समितीच्या गोलटगाव गणाच्या अटीतटीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने ही जागा राखत भाजपला धूळ चारली.

गोलटगाव पं.स.ची जागा काँग्रेसने राखलीगोलटगाव : औरंगाबाद पंचायत समितीच्या गोलटगाव गणाच्या अटीतटीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने ही जागा राखत भाजपला धूळ चारली. या रिक्त झालेल्या जागेसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. सोमवारी मतमोजणी होऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार शोभाबाई सुरेश लाळे यांनी भाजपचे उमेदवार सुरेश घोंगडे यांचा ५५४ मतांनी पराभव केला. पंचायत समिती सदस्य सुरेश धोंडीराम लाळे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर काँग्रेस आघाडीने दिवंगत सुरेश लाळे यांच्या पत्नी शोभाबाई सुरेश लाळे यांना उमेदवारी देऊन मतदारांना भावनिक आवाहन केले होते, तर भाजपने मागील पं. स. निवडणुकीमध्ये सुरेश लाळे यांच्याकडून पराभूत झालेले उमेदवार सुरेश गणपत घोंगडे यांना उमेदवारी देत स्थानिक विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवली होती. तसेच मागील पं.स.निवडणुकीमध्ये भाजपसोबत युती असलेल्या शिवसेनेने या पोटनिवडणुकीमध्ये ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत राधाकिसन भोजने या तरुण उमेदवाराला रिंगणात उतरवून भाजपला एकाकी पाडले होते. शे.का.प.ने परमेश्वर शिंगाडे यांना उमेदवारी देऊन ही निवडणूक चौरंगी केली होती.निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपसह काँग्रेस, सेनेचे तालुक्यातील सर्वच मोठे नेते ठाण मांडून बसले होते. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मतदारसंघामध्ये ही निवडणूक होत असल्याने भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. त्यामुळे ते स्वत: गणामध्ये नजर ठेवून होते; परंतु मतदारांनी इतर उमेदवारांच्या आश्वासनांना दुर्लक्षित करून शोभाबाई लाळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनाच विजयी कौल दिला.सेना-भाजपमध्ये मतविभाजनामुळे काँग्रेसचा विजयया निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने शोभाबाई लाळे यांना उभे केले, तर शिवसेना व भाजपने स्वतंत्र उमेदवार उभे केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होऊन त्याचा लाभ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराला झाला.उमेदवारांना मिळालेली मतेशोभाबाई लाळे -काँग्रेस =२२०६,सुरेश गणपत घोंगडे- भाजप =१६५२,राधाकिसन भोजने -शिवसेना =१४२६ परमेश्वर शिंगाडे- शे.का.प.=७९६,नोटा =११५,एकूण=६१९५ समाजकार्यामुळेच यश माझे पती सुरेश लाळे यांनी राजकारणातून केलेल्या समाजकार्यामुळे तसेच काँग्रेस पक्ष पाठीमागे भक्कमपणे उभा राहिल्यामुळे मतदारांनी विजयाच्या रूपाने आशीर्वाद दिला आहे. -शोभाबाई लाळे,विजयी उमेदवारअगरकानडगाव, ममदापूर ग्रा.पं. काँग्रेसकडेनेवरगाव : अगरकानडगाव व ममदापूर (ता.गंगापूर) या दोन्ही ग्रामपंचायतींवर काँग्रेसने वर्चस्व राखले आहे. सोमवारी मतमोजणीनंतर निकाल हाती येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. विभाजनामुळे स्वतंत्र झालेल्या अगरकानडगाव व ममदापूर या दोन्ही ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान झाले होते. अगरकानडगाव ग्रामपंचायतीमध्ये ९ सदस्य आणि ममदापूर ग्रामपंचायतीमध्ये ७ सदस्यांसाठी मतदान घेण्यात आले. त्यात अगरकानडगाव ग्रा.पं.मध्ये काँग्रेससमर्थक ५ सदस्य आणि शिवसेना समर्थक ४ सदस्य विजयी झाले. ममदापूरमध्ये काँग्रेस समर्थक ६, तर शिवसेनेचा केवळ १ समर्थक विजयी झाला. गड आला; पण...या दोन्ही ग्रामपंचायतींचे सरपंचपद एससी प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यातील अगरकानडगावचे सरपंचपद पुरुषासाठी, तर ममदापूरचे महिलेसाठी राखीव आहे. ममदापुरात काँग्रेससमर्थक ६ उमेदवार विजयी झाले, परंतु सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झाला. त्यामुळे शिवसेनेच्या या एकमेव विजयी झालेल्या उषा रणपिसे यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडणार आहे. अगरकानडगावात शिवसेना ४ आणि काँग्रेसचे ५ सदस्य विजयी झाले असून काँग्रेसचे संदीप लोहाळे सरपंचपदाचे दावेदार आहेत. अगर कानडगावातील विजयी उमेदवार व मते१) दिनकर कचरू दंडे -२५६२)रुख्मनबाई हरिश्चंद्र मिसाळ -२३७३)कविता भाऊसाहेब भाकरे -२३३४)बापू संतराम मिसाळ-२०३५)न्याजबी अब्दुल शेख -१९५६)अहेमद रसूल शेख-२०२७)संदीप लोहाळे -१६२८)मथुराबाई सुभाष कानडे -१६६९)देवचंद भागाजी बर्डे (बिनविरोध)ममदापुरातील विजयी उमेदवार व प्राप्त मते१)कल्याण असाराम जाधव - ९९२)उषा आबासाहेब रणपिसे- ९५३)ताराबाई एकनाथ पल्हारे -(बिनविरोध)४)सिंधूबाई मच्छिंद्र ताके -१०५५)शकुंतलाबाई भाऊसाहेब मोरे -१११६)सुनीता गणेश शिंदे -७१७)हिरालाल पल्हारे(बिनविरोध)पानवी खंडाळा ग्रा़पं़ राष्ट्रवादी काँग्रेसकडेवैजापूर : तालुक्यातील पानवी खंडाळा ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी (१८) जाहीर करण्यात आला आहे़ ७ जागापैकी ४ जागावर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ४ आणि शिवसेना समर्थक ३ उमेदवार विजयी झाले आहेत. येथील तहसील कार्यालयात तहसीलदार वंदना निकुंभ व नायब तहसीलदार चैताली दराडे यांच्या उपस्थितीत मतमोजणी झाली़ या निवडणुकीत पुढील उमेदवार विजयी झाले़ प्रभाग एक : बाबासाहेब कारभार, मीराबाई बावचे, ताराबाई बावचे, प्रभाग दोन : अमोल बावचे, चांगुणाबाई पंडित, प्रभाग तीन : आकाश बागूल, मंगला सोनवणे आहेत़ या मतमोजणीसाठी ए़ एस़ देवरे, धोंडीरामसिंह राजपूत, निवडणूक विभागाचे पी़एम़ दुशिंग, जी़ यू़ चौकडे, अशोक चांदकर, दीपक खैरे यांनी सहकार्य केले़ लाख खंडाळा ग्रामपंचायत बिनविरोधलाख खंडाळा ग्रामपंचायतीमध्ये यापूर्वीच बिनविरोध निवड झाली असून ही ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली आहे. विजयी मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा जल्लोष गोलटगाव येथे विजयी उमेदवार शोभाबाई लाळे यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर जल्लोष करीत विजय साजरा केला.दहा वर्षांनंतर उपळी ग्रामपंचायतीत भाजप पुरस्कृत पॅनलचा दणदणीत पराभवउपळी : सिल्लोड तालुक्यातील उपळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसपुरस्कृत श्री मारोती महाराज परिवर्तन पॅनलने भाजप पुरस्कृत शेतकरी ग्रामविकास पॅनलचा दणदणीत पराभव करीत ९ पैकी ६ जागा पटकावल्या आहेत. उपळी ग्रामपंचायत मागच्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात होती. सत्ता परिवर्तन होताच काँग्रेसच्या विजयी उमेदवारासह कार्यकर्त्यांनी गावात एकच जल्लोष केला. विजयी उमेदवारांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. विजयी उमेदवारांचे जनार्दन शेजूळ, प्रभाकर शेजूळ, संभाजी शेजूळ, राजेंद्र शेजूळ, योगेश फोलाने, राम कोटीये, मच्छिंद्र शेजूळ, विलास शेजूळ, कांता शेजूळ, दत्ता चव्हाण, सांडू पुंगळे, विठ्ठल गायकवाड, अशोक जाधव, राहुल महेर यांनी अभिनंदन केले.विजयी झालेले उमेदवार असेप्रभाग क्रमांक एकमधून नंदाबाई गणपत औटे,भगवान अंबादास नाईक व मीराबाई काशीनाथ सुरडकर. (सर्व मारोती महाराज परिवर्तन पॅनल)प्रभाग क्रमांक दोनमधून- दिलीप बाबुराव शेजूळ, पार्वताबाई भिका दुधे व शोभाबाई साहेबराव अहिरे (सर्व शेतकरी ग्रामविकास पॅनल) प्रभाग क्रमांक तीनमधून- प्रवीण संभाजी शेजूळ, काकरवाळ कामनबाई बारकू, संध्याबाई सुभाष शेजूळ. (सर्व मारोती महाराज परिवर्तन पॅनल)सत्ता परिवर्तनउपळी ग्रामपंचायत मागील दहा वर्षांपासून भाजप पुरस्कृत पॅनलच्या ताब्यात होती. यावर्षी मात्र मतदारांनी काँग्रेस पुरस्कृत पॅनलला कौल दिला.