शहडोल : मध्य प्रदेशातील मातीच्या खाणींमध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. या दुर्घटनेत सहा जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तर अजून मातीच्या ढिगाऱ्याखाली १० कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्याच्या पपरेडी गावात ही दुर्घटना घडली. हा परिसर ब्यौहारी ठाणाअंतर्गत येतो. याठिकाणी काही मातीचे ढिगारे खचल्यामुळे तिथे काम करणाऱ्या पाच ग्रामीण लोकांचा मृत्यू झाला. तसेच, या दुर्घटनेत 6 जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येते. याशिवाय, या खाणीमध्ये अजूनही काही कामगार अडकले असल्याचे समजते.
या खाणीत मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू होते. यावेळी ग्रामस्थ व मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशात काम करताना अचानक मातीचा काही भाग खचायला सुरुवात झाली. खाणीतील चिखलामुळे अनेक कामगार बाहेर येऊ शकले नाही. त्यामुळे अनेकजण खाणीतच अडकले.
दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
आणखी बातम्या...
भारत-चीन सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात, नेपाळशी चांगले संबंध – लष्कर प्रमुख
नवजात बाळाच्या हृदयात 3 ब्लॉक; आदित्य ठाकरेंनी उपचारांसाठी केली 'लाख'मोलाची मदत
CoronaVirus Treatment : HCQ सोबत अॅझिथ्रोमायसिनचा वापर घातक; काय होतोय परिणाम? वाचा...
'या' राज्यात पुन्हा लॉकडाऊन; वीकेंडला संपूर्ण राज्य बंद राहणार, सीमाही सील होणार
स्कीन लोशनऐवजी आले 19 हजारांचे Headphones; नंतर सांगितले “नॉन-रिटर्नेबल”