शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

तुमच्या खिशावर किती भार पडणार? 'या' पाच व्यक्ती ठरवणार; एक महाराष्ट्रातील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2021 4:18 PM

सर्वसामान्यांच्या खिशावर किती भार टाकायचा याचा निर्णय घेणारे पाच मंत्री

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार काल संपन्न झाला. राष्ट्रपती भवनात ४३ जणांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. काल रात्री उशिरा खातेवाटपही जाहीर झालं. मोदींच्या मंत्रिमंडळातले ५ शिलेदार सर्वसामान्यांच्या बजेटशी संबंधित निर्णय घेणार आहेत. या पाच मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांचा परिणाम थेट तुमच्या आमच्यावर खिशावर होईल. 

निर्मला सीतारामन यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारीमोदी २.० मध्ये अर्थ मंत्रालय सांभाळणाऱ्या निर्मला सीतारामन त्यांच्या राजकीय जीवनातील सर्वात कठीण काळातून जात आहेत. कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी आव्हान त्यांच्या समोर आहे. यासोबतच त्या कोविड-१९ इकॉनॉमिक रिस्पॉन्स टास्क फोर्सच्या प्रमुख आहेत. सीतारामन घेत असलेल्या प्रत्येक निर्णयाचा थेट संबंध नागरिकांच्या खिशाशी आहे. जनतेच्या खिशात किती पैसा राहणार याचा निर्णय सीतारामन घेतात, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

पेट्रोल, डिझेलचे दर कसे नियंत्रणात ठेवणार?हरदीप सिंग पुरी यांच्याकडे आता नागरी उड्डाण मंत्रालय होतं. आता त्यांना पेट्रोलियम मंत्रालय देण्यात आलं आहे. सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोलनं शंभरी ओलांडली आहे. तर डिझेलची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. इंधन वाढीचा थेट परिणाम वाहतुकीवर होणाऱ्या खर्चावर होतो. वाहतूक खर्च वाढल्यानं महागाई वाढते. जागतिक बाजारपेठेतील वाढत्या दराची झळ सर्वसामान्यांपर्यंत किती पोहोचू द्यायची याचा निर्णय आता पुरी यांच्यावर अवलंबून असेल.

नवे रेल्वे मंत्री तिकीट दरात वाढ करणार?कोरोना काळात रेल्वेनं लहान पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीट दरात वाढ केली. रेल्वे देशाची लाईफ लाईन आहे. त्यामुळे रेल्वेशी संबंधित निर्णयांचा परिणाम थेट कोट्यवधी लोकांच्या खिशावर होतो. रेल्वेच्या माध्यमातून देशभरात उत्पादनांची ने-आण होते. त्यामुळे नवे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. प्रशासकीय अधिकारी राहिलेल्या वैष्णव यांच्याकडे पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप विषयात काम करण्याचा मोठा अनुभव आहे.

सिंधियांसमोर उड्डाण क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढण्याचं आव्हानसर्वात वेगानं वाढणारी बाजारपेठ असं भारतीय हवाई क्षेत्राचं वर्णन केलं जातं. मात्र कोरोनामुळे या क्षेत्राचं मोठं नुकसान झालं. कोविड प्रतिबंधात्मक नियमांमुळे प्रवास महागला आहे. त्याचा बोझा सर्वसामान्यांवर पडला आहे. त्यामुळे प्रवास खर्चांचा कमीतकमी भार सामान्यांवर टाकून उड्डाण क्षेत्राला अडचणींमधून बाहेर काढण्याची कसरत ज्योतिरादित्य सिंधिया यांना करावी लागेल.

देशाचं पोट भरण्याची जबाबदारी पियूष गोयल यांच्याकडेआतापर्यंत रेल्वे मंत्रालय सांभाळणाऱ्या पियूष गोयल यांच्याकडे आता वस्त्रोद्योग मंत्रालय दिलं गेलं आहे. याशिवाय ग्राहकांशी संबंधित प्रकरणं, खाद्य आणि नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे गोयल यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी आहे. अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. गोयल महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार आहेत.

टॅग्स :Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनpiyush goyalपीयुष गोयलJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे