चिंता वाढली; केरळमध्ये झिका व्हायरसचे आणखी पाच रुग्ण, एकूण आकडा पोहोचला 28 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 11:21 AM2021-07-15T11:21:47+5:302021-07-15T11:22:23+5:30
Zika virus in Kerala : राज्यात एकूण 28 जणांना झिका व्हायसरची लागण झाली आहे, असे केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पुन्हा झिका व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात झिका व्हायरसच्या नवीन रुग्णांची पुष्टी झाली आहे. राज्यात आणखी पाच लोकांना झिका व्हायरसची लागण झाली आहे. या पाच नवीन रुग्णांपैकी अनायरामधील दोन, कुन्नुकुझी, पत्तम आणि पूर्व किल्ल्यातील प्रत्येकी एक रुग्ण झिका व्हायरसने संक्रमित झाले आहेत. तसेच, राज्यात एकूण 28 जणांना झिका व्हायसरची लागण झाली आहे, असे केरळच्याआरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. (Five more people in the state have been diagnosed with the Zika virus in Kerala)
तत्पूर्वी, केरळचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी बुधवारी सांगितले की, झिका व्हायरसच्या संसर्गाचा एक क्लस्टर तिरुअनंतपुरमच्या अनयारा परिसरातील तीन किलोमीटरच्या परिसतात आढळला आहे. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावित भागात डासांची फॉगिंग अधिक तीव्र केली जाईल, असे राज्यातील झिका व्हायरसच्या परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.
Five more people in the state have been diagnosed with the Zika virus - two people in Anayara, one each in Kunnukuzhi, Pattom and East Fort. With this, a total of 28 people in the state have been diagnosed with the Zika virus: Kerala Health Minister Veena George
— ANI (@ANI) July 15, 2021
(File photo) pic.twitter.com/kgoBxECKWa
आरोग्यमंत्री म्हणाल्या की, आम्ही एक सूक्ष्म योजना तयार केली आहे. रेक्टरने नियंत्रण कार्य अधिक तीव्र करण्याचा आणि फॉगिंग तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. तिरुवनंतपुरम महानगरपालिकेने या उपक्रम अधिक तीव्र केले आहेत आणि जिल्हा प्रशासनही त्यातील एक भाग असेल आणि सर्व विभागांचे समन्वय साधेल. पुढील 7 दिवस ते फॉगिंग करणार आहेत. तसेच, डीएमओ कार्यालयातून कंट्रोल रूम सुरु करण्यात आले आहे, जे चोवीस तास काम करेल. झिका व्हायरसबद्दल माहिती किंवा शंका असलेले लोक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकतात, असे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.
दरम्यान, देशात कोरोना व्हायरस संकट काळात आणखी एका झिका व्हायरसने चिंता वाढवली आहे. झिका व्हायरसच्या वाढत्या घटनांमुळे केरळमध्ये हायअलर्टची स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे यापूर्वीच राज्यांची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. अशा परिस्थितीत झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये झालेली वाढ केरळ सरकारला अडचणीची ठरू शकते. मात्र, झिका व्हायरस कोरोना इतका प्राणघातक नाही, ही एक दिलासादायक बाब आहे.
झिका व्हायरसची लक्षणे...
झिका व्हायरस हा डास चावल्यानंतर पसरणारा आजार आहे. याची लक्षणे चिकनगुनियासारखीच आहेत. हा व्हायरस एडीस डास चावल्यानंतर पसरतो. गर्भधारणेदरम्यान महिलांना जास्त संक्रमण होऊ शकते. ताप आणि शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे, स्नायू आणि डोकेदुखीचा त्रास, या आजारामुळे होते.