नवी दिल्ली : जगभरात थैमान घालत असलेल्या आणि चीनमधील हुआनपासून पसरलेल्या कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा फटका युरोप आणि अमेरिकेला बसला आहे. येथेच सर्वाधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सर्वाधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. महासत्ता म्हणवली जाणारी अमेरिकाही कोरोनापुढे हतबल झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, WHOने कोरोनाच्या धोक्यासंदर्भात वेळेवर माहिती दिली नाही. तसेच आवश्यक पावले उचलण्यापासूनही रोखले. एवढेच नाही, तर डब्ल्यूएचओ चीनचेच कौतुक करत राहिला, असा गंभीर आरोप करत डब्ल्यूएचओला दिला जाणारा निधी थांबवला आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.
डब्ल्यूएचओला निधी देणाऱ्या देशांत अमेरिकेचा पहिला क्रमांक लागतो. अमेरिकेकडून डब्ल्यूएचओला सर्वाधिक मदत मिळत होती. त्यामुळे अमेरिकेने निधी रोखण्याचा घेतलेला निर्णय फार मोठा असून याचे दूरगामी परिणाम होतील, असे बोलले जात आहे. ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओवर चुकीची माहिती दिल्याचा आणि चीनने दिलेल्या माहितीवरच अवलंबून राहिल्याचाही आरोप केला आहे. तसेच यामुळेच कोरोना जागतिक पातळीवर कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असल्याचेही म्हटले आहे.कोरोनामुळे आतापर्यंत अमेरिकेत सर्वाधिक म्हणजेच 26,047 जणांचा मृत्यू झाला. तर तब्बल 613,886 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
डब्ल्यूएचओला निधी देणारे महत्वाचे देश -
अमेरिकेत गेल्या 24 तासांत 2,228 जणांचा मृत्यू -
भारतीय रुपयांत विचार केल्यास एकटी अमेरिकेच डब्ल्यूएचओला जवळपास 440 कोटी रुपयांचा निधी देत होती. अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे दोन हजार लोकांचा मृत्यू झाला. जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या 24 तासांत तब्बल 2,228 लोकांचा मृत्यू झाला आहे.