रांची/रायपूर : झारखंडच्या रांचीमध्ये नवादी जंगलालगतच्या गावात गुरुवारी रात्री सुरक्षा दलासोबत झालेल्या भीषण चकमकीत एका महिला नक्षलीसह चार नक्षलवादी ठार झाले. तर दुसऱ्या घटनेत छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त कोंडागाव जिल्ह्णात पोलिसांनी एका नक्षलवाद्याला यमसदनी पाठविले.रांचीचे पोलीस अधीक्षक (ग्रामीण) राजकुमार लाकरा यांनी दिलेल्या माहितीनुसार रांची-जमशेटपूर राष्ट्रीय महामार्गावर घाग्राबेडा गावात ही चकमक उडाली. यात दोन जवानही जखमी झाले असून त्यांना मध्यरात्रीनंतरच इस्पितळात दाखल करण्यात आले. नक्षलवाद्यांचा एक गट जंगलात दडून असल्याची सूचना मिळाल्यावर ही कारवाई करण्यात आली.छत्तीसगडच्या हिरामंडल गावातील जंगलात नक्षल्यांच्या हालचाली सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक रवाना करण्यात आले होते. या पथकावर नक्षल्यांनी गोळीबार केल्यावर पोलिसांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. या कारवाईत बलदेव ऊर्फ जनेश नामक नक्षली ठार झाला. तो मिलिटरी कंपनी नंबर सहाचा सदस्य होता, अशी माहिती कोंडगाव जिल्ह्णातील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. (वृत्तसंस्था)
चकमकीत पाच नक्षलवादी ठार
By admin | Published: February 20, 2016 3:17 AM