नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या बसने अचानक पेट घेतल्याने 5 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. तर यामध्ये 27 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये एका बाळाचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे एका खासगी बसला अचानक भीषण आग लागली. ही बस बंगळुरूहून विजयापुराकडे जात असताना चित्रदुर्ग महामार्गावर बसला आग लागली. या आगीत एका बाळासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 27 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बसने पेट घेतला त्यावेळी बसमध्ये जवळपास 32 प्रवासी होते.
मृतांमध्ये दोन लहान मुलं आणि एक महिलेचाही समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, इंजिनला आग लागण्याचे कारण सांगितले जात आहे. हिरियूरच्या एसपी राधिका यांनी अपघाताची माहिती घेतली. जखमी झालेल्या 27 जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक पोलिसांनी एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
"ऑपरेशन कमळ' फसले, हा राजकीय विकृतीचा पराभव', शिवसेनेचं भाजपावर टीकास्त्र
"10 दिवसांत तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना ठार करू", पाकिस्तानातून साक्षी महाराजांना धमकी
बंगळुरू पेटलं! शहरात कलम 144 लागू; पोलिसांवर हल्ला केल्या प्रकरणी 110 जणांना अटक
कोरोना बैठकीत योगींसमोरच मुख्य सचिव खेळत होते गेम, आपने ट्विट केला 'तो' फोटो
लय भारी! बोटीतून निघाला नवरदेव अन् पाहुणे मंडळी पाण्यात, पुरात निघाली हटके वरात
बापरे! बटाट्याच्या भाजीला विरोध केला म्हणून संतापलेल्या पत्नीने पतीला धोपाटण्याने चोपले
यूपीत टवाळखोरांचा उच्छाद! अमेरिकेत स्कॉलरशिप मिळवण्याऱ्या 'तिला' छेडछाडीत गमवावा लागला जीव