शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

पाच वीज पारेषण प्रकल्प अडकले

By admin | Published: January 08, 2015 11:44 PM

वीज पारेषणचे सात हजार कोटी रुपयांचे पाच प्रकल्प वन्यजीव विभागाकडून मान्यता न मिळाल्यामुळे पुढे सरकू शकलेले नाहीत.

नवी दिल्ली : वीज पारेषणचे सात हजार कोटी रुपयांचे पाच प्रकल्प वन्यजीव विभागाकडून मान्यता न मिळाल्यामुळे पुढे सरकू शकलेले नाहीत. साधारणत: वीज पारेषण प्रकल्प सुरू करण्यासाठी कंपनीला ३६ ते ५० महिने लागतात व त्यातील २४ महिने हे वन्यजीव विभागाकडून मंजुरी मिळविण्यात लागतात, असे सूत्रांकडून कळते.या पाच प्रकल्पांतील ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) व जयपूर (राजस्थान) येथील प्रकल्प पारेषण लाईनमध्ये समाविष्ट असून हे प्रकल्प वन्यजीव अभयारण्याशी संबंधित आहेत. ग्वाल्हेर ते जयपूर पारेषण वाहिनीलाही वन्यजीव विभागाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. त्यानंतर वन विभागाच्या मंजुरीसाठी उच्च न्यायालयाकडून मंजुरी मिळवावी लागेल.पुनातसांगचू (भूतान)- अलीपूरदुआर (पश्चिम बंगाल) तथा पुनातसांगचू-१ अलीपूरदुआर प्रकल्पांच्या रस्त्यांतही वन्यजीव क्षेत्र आहे. हा प्रकल्पही राज्याच्या वन्यजीव मंडळाकडे विचारार्थ पाठविण्यात आला आहे. मध्यप्रदेशातील खारमोर वन्यजीव अभयारण्याच्या रस्त्यातून जाणारी राजगढ- करमसाड पारेषण वाहिनीलाही मंजुरीची प्रतीक्षा आहे.या प्रकल्पांना खूप कमी जागा लागते व त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडेही तोडावी लागत नाहीत. वीज पारेषण प्रकल्प हे वाहिन्यांच्या रूपात असतात व त्या मुख्यत: जमिनीपासून उंचीवरून नेल्या जातात. त्यामुळे त्यांचा पर्यावरणावरील परिणाम काय होईल याच्या अभ्यासाची गरज नसते. शिवाय पारेषण मनोऱ्यांमुळे वन्यजीवांना मुक्तपणे फिरण्यास कोणताही अडथळा येत नाही, असे सरकार न्यायालयाला सांगू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.