संतोष ठाकूर नवी दिल्ली : मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये सत्ताधाऱ्यांबद्दल असलेल्या नाराजीचा विधानसभा निवडणुकीत फटका बसू नये यासाठी भाजप संपूर्णपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच अवलंबून आहे. या तिन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारबद्दल जी नाराजी आहे ती मोदी यांच्या सभांमुळे दूर होईल, असे भाजपला वाटते.या तर्काबद्दल पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाºयाने सांगितले की, कर्नाटकात सरकार स्थापन करण्यात आम्हाला अपयश भलेही आले असेल; परंतु मोदी यांच्या तेथील सभेने पक्षाला आपल्या जागा वाढवण्यात मदत मिळाली होती. मोदी यांच्या वैयक्तिक प्रतिमेमुळे पक्षाला सतत लाभ होत आहे व या तिन्ही राज्यांच्या निवडणुकींत त्यांच्या प्रभावाचा पक्षाला लाभ होईल.येत्या दोन ते तीन दिवसांत नरेंद्र मोदी यांच्या छत्तीसगढमधील निवडणूक सभेचा कार्यक्रम निश्चित होऊ शकतो. मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणूक सभांदरम्यान कमीत कमी दोन ते तीन दिवसांचे अंतर ठेवण्याचाही विचार होत आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकांत मोदींच्या सभांवरच भाजपाची मदार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 4:54 AM