शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

Gujarat Assembly Election 2022: गेल्या पाच वर्षांत गृहमंत्र्यांच्या मालमत्तेत 721 टक्क्यांनी वाढ; निवडणूक लढवणार्‍या 125 आमदारांपैकी 5 झाले अधिक श्रीमंत, ADR चा रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 5:42 PM

Gujarat Assembly Election 2022: या निवडणुकीत सर्व पक्षांनी रिंगणात उतरवलेल्या 125 आमदारांपैकी मालमत्ता वाढीच्या बाबतीत अव्वल पाच आमदार भाजपचे  (BJP) असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) मंगळवारी गुजरात निवडणुकीशी (Gujarat Election) संबंधित काही आकडेवारी सादर केली आहे. या आकडेवारीनुसार, गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष सांघवी  (Harsh Sanghavi) यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत 721 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या निवडणुकीत सर्व पक्षांनी रिंगणात उतरवलेल्या 125 आमदारांपैकी मालमत्ता वाढीच्या बाबतीत अव्वल पाच आमदार भाजपचे  (BJP) असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष सांघवी आणि त्यांच्या पत्नीची मालमत्ता 2017 मध्ये 2.12 कोटी रुपये होती. ती आता 2022 मध्ये 17.42 कोटी रुपये झाली आहे, असे असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) रिपोर्टद्वारे समोर आले आहे. तसेच, हिरे व्यापारी हर्ष सांघवी पुन्हा एकदा सूरतच्या माजुराच्या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. रिपोर्टनुसार, सांघवीच्या तुलनेत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची संपत्ती 2017 मध्ये 5.19 कोटी रुपयांवरून 2022 मध्ये 58 टक्क्यांनी वाढून 8.22 कोटी रुपये झाली आहे.

असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या आकडेवारीनुसार, सर्व पक्षांनी रिंगणात उतरवलेल्या 125 आमदारांपैकी मालमत्ता वाढीच्या बाबतीत अव्वल पाच आमदार भाजपचे आहेत. सांघवी यांच्याशिवाय भाजपच्या अन्य चार आमदारांच्या संपत्तीत पाच वर्षांतील सर्वाधिक वाढ झाली आहे. या आमदारांमध्ये खेडा जिल्ह्यातील मेहमदाबाद मतदारसंघाचे उमेदवार ग्रामविकास मंत्री अर्जुनसिंह चौहान यांच्या कौटुंबिक संपत्तीत 573 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  दुसरीकडे, दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा येथील शैलेश भाभोर (संपत्तीमध्ये 481 टक्के वाढ), उंबरगाव येथील रमणलाल पाटकर (संपत्तीमध्ये 335 टक्के वाढ), बडोदा शहरातील मनीषा वकील (संपत्तीमध्ये 308 टक्के वाढ)  समोर आले आहेत. 

दरम्यान, गुजरात विधानसभेसाठी यंदा पुन्हा निवडणूक लढवणाऱ्या 125 आमदारांपैकी 71 भाजपचे आहेत. तर 50 काँग्रेस समाजवादी पक्षाचे (सपा) आहेत. याशिवाय, तीन अपक्ष आमदार पुन्हा रिंगणात आहेत. यापैकी 105 आमदारांच्या संपत्तीत वाढ नोंदवण्यात आली असून, त्यापैकी 59 भाजप आमदार आहेत. काँग्रेसचे 43 आमदार आहेत. इतर सपा आणि अपक्ष आहेत.

182 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणारगुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरला विधानसभेच्या 89 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 5 डिसेंबरला 93 जागांसाठी मतदान होणार आहे. 8 डिसेंबरला निकाल लागणार आहे. यानंतर गुजरातमध्ये पुन्हा कोण सत्तेवर बसणार, हे स्पष्ट होईल. भाजप, काँग्रेस आणि आप हे तिन्ही पक्ष जोरदार निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. आपनेही 29 जागांवर नशीब आजमावले, पण एकाही जागेवर आपले खाते उघडता आले नाही. यंदाच्या निवडणुकीत आप जोरदारपणे निवडणूक लढवत असल्याने ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :GujaratगुजरातGujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपा