परदेशातून येणारे पर्यटक, हॉलिवूडचे चित्रपट आणि टीव्हीसाठीचे क्रू अशा उत्सुक नवख्यांना‘भारत’ समजून देण्यासाठी दाम घेऊन काम करणाऱ्या एका सिक्रेट जगात : शची मराठे कृष्णा पुजारी आणि राहुल खंदारे.एरवी या भल्या प्रचंड मुंबईत त्यांना कोणी ओळखणारही नाही.पण परदेशातून येणारे फिरंगी त्यांच्या भरवशावर मुंबई नावाच्या अनोळखी मायानगरीत उतरण्याची हिंमत करतात.कुणा टूरिस्टांना धारावीत भटकून तिथलं जगणं ‘अनुभवायचं’ असतं, मुंबईचा अभ्यास करायला आलेल्या कुणा लेखक-पत्रकारांना दुभाषे हवे असतात, बीबीसी नाहीतर नॅशनल जिआॅग्राफिकच्या कुणा चॅनलवाल्यांना इंडियन स्ट्रीट फूडवरच्या एपिसोडसाठी मुंबईतली ‘पावभाजी’ शूट करायची असते,कुणा डॅनी बोएलला त्याच्या ‘स्लमडॉग मिलिनियर’साठी मुंबईच्या रेड लाइट एरियातला अस्सल ‘कोठा’ शोधून हवा असतो,कुणा ज्युलिआ रॉबटर््सला साडी नेसवून देणारी बाई हवी असते; तर आणखी कुणा हॉलिवूडवाल्याला त्याचं मुंबईतलं शूटिंग निर्विघ्न पार पडावं म्हणून गल्लीतले दादा मॅनेज करायला मदत हवी असते... हे सगळं चुटकीसरशी जमवून देणारी एक जमात मुंबईत राहते.... त्यांच्या जगात!
फिक्सर्स
By admin | Published: October 18, 2016 7:03 AM