बेळगाव : बेळगावातील किल्ला तलावाच्या काठावर ११0 मीटर (३६0 फूट) उंचीचा राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. देशातील सर्वाधिक उंचीच्या अटारी सीमेवरील राष्ट्रध्वजाच्या उंचीएवढा तो आहे.सोमवारी सकाळी या ध्वजाचे लोकार्पण करण्यात आले. या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्राच्या बँडने केवळ पाचच मिनिटांत मशीनच्या साहाय्याने ध्वज फडकाविला आणि त्याला मानवंदना दिली. भारत-पाक अटारी सीमेवरील ध्वज आणि बेळगावच्या ध्वजाची उंची एकसमान झाली आहे. राष्ट्रध्वजाच्या उद्घाटन सोहळ्यात बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी लिफ्ट मशीनचे बटन दाबून ध्वज फडकावला. या ध्वजासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून खास परवानगी मिळविण्यात आली असून कायमस्वरूपी हा ध्वज फडकवत ठेवला जाणार आहे. या ध्वजाकडे पाहून देशप्रेम जागृत करण्यास बेळगावकर जनतेला मदत होईल, अशी प्रतिक्रिया बेळगावचे आमदार फिरोज सेठ यांनी दिली.>देशातील सर्वाधिकउंच उभारलेले राष्ट्रध्वजबेळगाव ३६0 फूट (कर्नाटक)अटारी सीमा ३६0 फूट (पंजाब)कोल्हापूर ३0३ फूट (महाराष्ट्र)पहाडी २९३ फूट (रांची,मंदिर झारखंड)हैदराबाद २९१ फूट (तेलंगण)
बेळगावात फडकला देशातील सर्वांत उंच राष्ट्रध्वज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 5:55 AM