शहरं
Join us  
Trending Stories
1
Sourav Ganguly, Police Complaint: सौरव गांगुलीने केली तक्रार, कारवाई करण्यासाठी पोलीस 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; प्रकरण काय?
2
गणपती विसर्जन मिरवणुकीत भंडारा येथे इमारतीचा सज्जा खचला; ३ महिला गंभीर, ६ किरकोळ जखमी
3
Lebanon Explosions: लेबनानमध्ये पेजर नंतर आता रेडिओ-लॅपटॉप, मोबाईल स्फोट; ३ ठार, १००हून अधिक जखमी
4
महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’, नागपुरात भाजपची डोकेदुखी वाढली, आभा पांडे बंडखोरीच्या भूमिकेत
5
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; लातुरात आराेपीला १० वर्षांचा सश्रम कारावास, लाखाचा दंड
6
'धुळ्याच्या लेकी'चा राजेशाही थाट! बॉलिवूडच्या मृणाल ठाकूरचा 'रॉयल कारभार', पाहा Photos
7
वेसावे कोळीवाड्यात शिपीलमधून ७४ गणेशमूर्तींचे विसर्जन; २० तास चालला विसर्जन सोहळा
8
२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय?
9
Fazalhaq Farooqi Allah Ghazanfar, AFG vs SA: टांगा पलटी घोडे फरार... 'अफगाणी' आक्रमणापुढे आफ्रिकेचे लोटांगण, १०६ धावांत All Out
10
बिहारच्या नवादामध्ये गावगुंडांचा हैदोस; अंदाधुंद गोळीबारानंतर 80 घरांना लावली आग
11
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न, रॅलीजवळ कारमध्ये आढळली स्फोटके
12
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय; मोदी सरकारने PM-ASHA योजनेसाठी मंजूर केले ₹35,000 कोटी
13
"एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे पण...", राज ठाकरेंनी विचारले नाना प्रश्न
14
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
15
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
16
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
17
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
18
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
19
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
20
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल

फ्लॅशबॅक 2016 : मार्च

By admin | Published: December 24, 2016 12:00 AM

उत्तराखंडमधील सत्ताधारी काँग्रेसमधील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली.बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रसेल्स शहरातील विमानतळ आणि मेट्रोमध्ये दहशतवाद्यांनी २२ मार्च रोजी बॉम्बस्फोट घडवले. या हल्ल्यात २५ जम ठार तर २००हून अधिक नागरिक जखमी झाले.विदर्भासह स्वतंत्र मराठवाड्याचे समर्थन करणारे वक्तव्य राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांना भलतेच महागात पडले आणि ...

उत्तराखंडमधील सत्ताधारी काँग्रेसमधील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली.

बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रसेल्स शहरातील विमानतळ आणि मेट्रोमध्ये दहशतवाद्यांनी २२ मार्च रोजी बॉम्बस्फोट घडवले. या हल्ल्यात २५ जम ठार तर २००हून अधिक नागरिक जखमी झाले.

विदर्भासह स्वतंत्र मराठवाड्याचे समर्थन करणारे वक्तव्य राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांना भलतेच महागात पडले आणि त्यांनी २२ मार्च रोजी पदाचा राजीनामा दिला. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेपुढे नमते घेत राज्य सरकारने अखेर अणेंचा राजीनामा घेतला.

दलित व आदिवासींसाठी आरक्षणाचे धोरण रद्द करण्याची मागणी कोणीही केली तरी ते शक्य नाही अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरक्षणाबाबतची ठाम भूमिका स्प्ष्ट केली.

पुणे येथे जर्मन बेकरीमध्ये २०१० साली झालेल्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी हिमायत बेग याला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली फाशी मुंबई उच्च न्यायायलयाने १७ मार्च रोजी रद्द केली. धक्कादायक बाब म्हणजे स्फोटाचा कट रचणे बॉम्बस्फोट घडवून १७ जणांचा जीव घेणे बेकायदा कृत्य यासह अन्य महत्वाचे आरोप सिद्ध करण्यात तपास यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याने न्यायालयाने सर्व आरोपांतून बेगची निर्दोष मुक्तता केली. मात्र स्फोटके बाळगल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायायलयाने सुनावलेली जन्मठेप मात्र कायम ठेवली.

मादाम तुसाँच्या वॅक्स स्टॅच्यू किंवा मेणाच्या पुतळ्यांच्या म्युझियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा दाखल करण्यासाठी म्युझियमच्या कलाकारांनी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली आणि मोदींनी त्यांना हवी तशी पोजही दिली

कोणी गळ्यावर सुरी ठेवली तर भारत माता की जय म्हणणार नाही अशी दर्पोक्ती एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लातूरमधील सभेत केली होती. मोहन भागवत यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले.

महाराष्ट्र सदन तसेच इतर ११ प्रकरणांच्या घोटाळ्यातून तब्बल ८७० कोटी रुपये बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना १४ मार्च रोजी अटक करण्यात आली. ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून त्यांना काळापैसा प्रतिबंधक कायद्यान्वये अटक करण्यात आली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १०व्या वर्धापनदिनी राज ठाकरेंनी रस्त्यावर नवीन रिक्षा तुम्हाला रस्त्यावर दिसल्या तर चालक आणि प्रवाशांना रिक्षातून उतरवा आणि त्या रिक्षा जाळून टाका असे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. एका उदयोगपतीला कोट्यावधींचा नफा मिळवून देण्यासाठी ७० हजार रिक्षांचे परवाने देण्याचे काम राज्य शासनाकडून सुरु असल्याचा आरोप करत त्यांनी हा वादग्रस्त आदेश दिल्यानंतर एकच खळबळ उडाली.

बँकांचे जवळपास 9000 कोटी रुपयांचे कर्ज बुडवलेले किंगफिशर एअरलाइन्सचे प्रमुख विजय माल्या भारतातून पसार झाले. एवढेच नव्हे तर ते 275 कोटी रुपयांसह इंग्लंडला गेल्याचे समोर आले.

शिखर धवन (६०) आणि विराट कोहलीच्या (४१) तडाखेबाज खेळीमुळे भारताने बांग्लादेशवर ८ गडी राखून विजय मिळवत आशिया कप स्पर्धा जिंकत चषकावर नाव कोरले.

जेएनयूतील प्रकरणावर बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी आजकाल आपल्या देशातल्याच लोकांना भारत माता की जय असं बोलायला शिकवावं लागत असल्याची खंत व्यक्त केली होती.

पक्षातील तरूण आणि हुशार नेत्यांमुळे राहुल गांधी झाकोळले जातील या भीतीनेच काँग्रेसमध्ये तरूण नेत्यांचा विकास होऊ दिला जात नाही त्यांना बोलू देत नाही अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीवर टीकास्त्र सोडले.

जागतिक अर्थव्यवस्था संकटात आहे वित्तीय बाजारपेठेत घसरण सुरु आहे मात्र या परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे असे सांगत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१६-१७ चा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी देण्यात आलेल्या निधीत केवळ ४.८ टक्के वाढ झाली.