कर्नाटकातील मंगळुरू येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमधील सीक्रेट चॅटने खळबळ उडवून दिली. प्रकरण इतके वाढले की विमान उड्डाणासाठी सहा तास प्रवाशांना ताटकळात राहावं लागलं. एवढेच नाही तर सर्व प्रवाशांना विमानातून उतरावे लागले आणि त्यांची सखोल तपासणी करावी लागली. नेमकं हा काय प्रकार आहे त्याबद्दल जाणून घेऊया.
ही घटना १४ ऑगस्ट रोजी घडली होती. विमानातून एक मुलगा मंगळुरूहून मुंबईला जाणार होता. त्याच्या सीटवर बसून तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत फोनवर गप्पा मारत होता. यादरम्यान, मुलगी त्या मुलाला असा एक मेसेज पाठवते ज्यामुळे विमानातील सगळेच प्रवासी हैराण होतात. मेसेजनंतर फ्लाइटमध्ये एकच गोंधळ उडल्याचं पाहायला मिळतं.
मुलीला बंगळुरूला जायचे होतेमिळालेल्या माहितीनुसार, तरुणी बंगळुरूला जाणार होती. यादरम्यान ती तिच्या प्रियकराशी सुरक्षेबाबत गमतीने बोलत होती. मग तिने गमतीने त्या मुलाला मेसेज केला, 'यू आर बॉम्बर'. या गप्पा त्या मुलाच्या शेजारी बसलेला सहप्रवासी वाचतो आणि क्रू मेंबर्सना त्याची माहिती देतो. त्यानंतर हा प्रकार एअर ट्रॅफिक कंट्रोलरला कळवला जातो, त्यानंतर विमान थांबवावे लागते. सर्व प्रवाशांना फ्लाइटमधून बाहेर काढल्यानंतर संपूर्ण विमानाची तपासणी केली जाते. तपास पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता विमान मुंबईकडे रवाना झाले. माहितीनुसार, फ्लाइटमध्ये १८५ प्रवासी होते.
दोघांची चौकशीही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मुलगा आणि मुलगी दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. दोघे गमतीने बोलत असल्याचं पोलिसांसमोर येताच त्यांनी डोक्यावर हात मारला. चौकशीमुळे मुलगी बेंगळुरूला जाऊ शकली नाही. शहर पोलिस आयुक्त एन. सुरक्षेबाबत या जोडप्यामध्ये गमतीनं संभाषण असल्याने रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचं शशी कुमार यांनी सांगितले.