नवी दिल्ली- काश्मीर खोऱ्यात शुक्रवारच्या नमाजनंतर अनेक ठिकाणी झालेल्या चकमकीत तीन जण ठार तर १५० पेक्षा जास्त जण जखमी झाले. फुटीरवाद्यांनी जाहीर केलेला हजरत बाल दर्ग्याकडे मोर्चा रोखण्यासाठी अनेक भागांत संचारबंदी लागू करण्यात आली असतानाही या चकमकी झाल्या. गेल्या महिनाभरापासून खोऱ्यात मरण पावलेल्यांची संख्या ताज्या तीन जणांच्या मृत्युने ५३ झाली आहे.बडगाम जिल्ह्यातील चदुरा भागात नमाजनंतर जमावाने सुरक्षा दलांवर दगडफेक सुरू करताच त्यांनी गोळीबार केला त्यात मोहम्मद मकबूल खांडे ठार झाला. त्याच्या मृत्युचे वृत्त समजताच चनापूर-चदुरा रस्त्याला लागून असलेल्या अनेक भागांत सुरक्षा दलांशी चकमकी झाल्या. त्यात दोघे जखमी झाले. त्यांना रुग्णालयात आणले असताना त्यांचा मृत्यू झाला.
काश्मीरमध्ये चकमक; तीन ठार, १५० जखमी
By admin | Published: August 06, 2016 4:03 AM