रायपूर : छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्णात मंगळवारी संयुक्त दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान शहीद तर अन्य तिघे जखमी झाले.बासागुडा पोलीस स्टेशनअंतर्गत नक्षल्यांच्या हालचालींची गोपनीय सूचना मिळाली होती. त्यानंतर सीआरपीएफच्या पथकास शोध मोहिमेवर पाठविण्यात आले होते. हे पथक तीमापूर गावाजवळील जंगलात पोहोचताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबारात दलाचा सुनील राम नामक जवान शहीद तर धर्मेंद्रसिंग भदौरियासह तिघे जखमी झाले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली.नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला सीआरपीएफच्या जवानांनीही प्रत्युत्तर दिले. काही काळ चाललेल्या चकमकीनंतर नक्षलवादी पळून गेले. त्यांना शोधण्याकरिता अतिरिक्त पोलीस कुमक जंगलात गेली आहे. (वृत्तसंस्था)
नक्षलवाद्यांशी चकमक; जवान शहीद
By admin | Published: August 18, 2015 10:18 PM