शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

फ्लिपकार्टवर पुन्हा मिळणार रिफंड !

By admin | Published: April 26, 2017 1:02 PM

ग्राहकांची संख्या घटण्याच्या भीतीपायी फ्लिपकार्टला ती पॉलिसी मागे घ्यावी लागली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 26 - ई- कॉमर्समध्ये आघाडीची कंपनी असलेल्या फ्लिपकार्टनं गेल्या काही दिवसांपूर्वी नो रिफंड पॉलिसी बाजारात आणली होती. मात्र ग्राहकांची संख्या घटण्याच्या भीतीपायी फ्लिपकार्टला ती पॉलिसी मागे घ्यावी लागली आहे. ऑनलाइन बाजारातून ग्राहक प्लिपकार्टपासून दूर जाण्याच्या चिंतेमुळे फ्लिपकार्टनं ही पॉलिसी नव्या पद्धतीनं पुन्हा ग्राहकांसाठी सेवेत आणली आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने शॉपिंग करणा-या ग्राहकांना वस्तू परत केल्यास आता रिफंडच्या स्वरूपात पैसे मिळणार आहे. बुक्स, होम डेकोर आणि लाइफस्टाइल, फॅशन प्रॉडक्शन, फिटनेस इक्विपमेंट, म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स आणि इतर वस्तूंवर फ्लिपकार्टचे ग्राहक आता रिफंड मिळवू शकतात.

देशातली सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या फ्लिपकार्टनं गेल्या काही दिवसांपूर्वी स्वतःच्या ग्राहकांना खरेदी केलेल्या वस्तूवर रिफंड देणं बंद केलं होतं. तसेच कंपनी अद्यापही मोबाइल फोन, फर्निचर, एअर कंडिशनर, वॉशिंग मशिन, टेलिव्हिजन सारख्या उत्पादनांवर रिफंड देत नाही. कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, 1 वर्षाच्या दरम्यान रिटर्न पॉलिसीत कोणताही बदल झाला नाही. फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर गेल्या आठवड्यात पॉलिसीला अपडेट करण्यात आलं होतं आणि यात "नो रिफंड ऑफर्ड, ऑल सेल्स आणि फायनल" याचा उल्लेख नव्हता. फ्लिपकार्टची रिटर्न पॉलिसी ग्राहकांसाठी फायदेशीर आहे. एक वर्षांमध्ये यात कोणताही बदल झाला नाही. आमच्या ग्राहकांनी फ्लिपकार्टवर कोणत्याही अडथळ्याविना रिटर्न एक्सपीरियन्सचा मजा घेतली आहे. फ्लिपकार्टवरच्या 1800 सेक्शनमधील दोन तृतीयांश सेक्शनसाठी रिफंडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

पॉलिसीनुसार, कपडे, फूटवेअर, आयवेअर आणि फॅशनच्या उपकरणांसारख्या निवडक प्रॉडक्ट बदलण्यासाठी 30 दिवसांचा अवधी दिला जातो. या दिलेल्या मुदतीत बदलता येऊ शकते. आता या प्रोडक्टसाठी अवधीमध्ये रिफंडचीही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मात्र एवढ्या लवकर पॉलिसीमध्ये बदल केल्यामुळे ब-याचदा ग्राहक संभ्रमात पडतो. ग्राहक ब-याचदा ई-कॉमर्सच्या माध्यमातून खरेदी करतात. त्यामुळे कोणत्या वस्तूला ही सुविधा लागू अथवा नाही, हे ग्राहकाला समजून घेण्याचा अधिकार आहे. वारंवार पॉलिसीमध्ये बदल केल्यामुळे ग्राहकांचा विश्वासही उडत चालला आहे, असंही कंपनीचे कंसल्टिंग चीप एग्झिक्युटिव्ही देवांग्शु दत्ता म्हणाले आहेत.