जगात सर्वाधिक टपाल कार्यालये (पोस्ट आॅफिसेस) भारतात असल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र, तरंगते टपाल कार्यालयही आहे हे ठाऊक आहे का? श्रीनगरमध्ये असलेल्या दल सरोवर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आलेले आहे. याच सरोवरावर भारताचे पहिले तरंगते टपाल कार्यालय सुरू आहे. आॅगस्ट २०११ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झाले. तेव्हापासून हे कार्यालय पर्यटकांना आकर्षित करीत आहे. हाउस बोटीवर उभारण्यात आलेल्या या कार्यालयात टपाल तिकिटांचे संग्रहालय आणि टपाल टिकिटे आणि इतर टपाल साहित्याची विक्री करणारे दालन आहे. चित्रांकित टपालपत्रे, शुभेच्छापत्रे, स्टेशनरी आणि काश्मीरवरील पुस्तकेही येथे मिळतात. पर्यटकांनी येथून जगभरातील आपल्या मित्रांना ई-मेल, तसेच दूरध्वनीही करता येतो. या टपाल कार्यालयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या ठिकाणाहून पाठविण्यात येणाऱ्या पत्रांचे विशेष डिझाइन आहे. या पत्रांवर दल सरोवर, तसेच श्रीनगरमधील इतर ठिकाणांची छायाचित्रे आहेत.
तरंगते टपाल कार्यालय
By admin | Published: January 06, 2017 2:13 AM