शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

राजस्थानच्या वाळवंटात पूर तर काही राज्ये पाण्यासाठी तरसली; भारतात पावसाचा पॅटर्न बदलतोय..?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 4:23 PM

भारतात मान्सूनचा पॅटर्न झपाट्याने बदलतोय, ज्यामुळे एकतर कमी वेळेत जास्त पाऊस पडतोय किंवा अजिबात पडत नाहीये.

नवी दिल्ली: सध्या मध्य प्रदेशात पावसाने थैमान घातले आहे, गेल्या तीन दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. राजधानी भोपाळमधील परिस्थिती अनियंत्रित झाली असून, मोठा तलाव पूर्णपणे भरला आहे. तलावात उभ्या असलेल्या बोटी वादळामुळे बुडण्याची भीती आहे. असाच काहीसा प्रकार राजस्थानमध्येही घडत आहे. बहुतांश धरणे, नद्या, तलाव भरले आहेत. पाऊस इतका पडला की पुढच्या वर्षी पाऊस पडला नाही तरी दुष्काळ पडणार नाही.

या राज्यात कमी पाऊसपण, तिकडे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडसह अनेक राज्ये पाण्यासाठी आसुसलेली आहेत. पिकांचे नुकसान झाल्याने येथील शेतकरी चिंतेत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये 75 पैकी 64 म्हणजेच 85% जिल्हे असे आहेत, जिथे सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मान्सून आपला पॅटर्न कसा बदलतोय, हे अशा पद्धतीने समजून घ्या की, एकीकडे मध्य प्रदेश ओलाचिंब होत आहे, पण लगतचा उत्तर प्रदेश मात्र पाण्यासाठी तडफडत आहे. तामिळनाडूमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, मात्र लगतच्या केरळमध्ये अजूनही पाहिजे तसा पाऊस पडलेला नाही.

अनेक राज्यांत मुसळधारजून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे भारतात मान्सूनचे हंगाम आहेत, त्याला दक्षिण पश्चिम मान्सून म्हणतात. भारताच्या वार्षिक पावसाची सुमारे 75% गरज नैऋत्य मान्सूनद्वारे भागवली जाते. त्यामुळे हे चार महिने पावसाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण, या चार महिन्यांत अशी काही राज्ये आहेत ज्यांच्यावर ढग दयाळू आहेत. पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये इतका पाऊस झाला की, पूर आणि भूस्खलनामुळे 32 जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, हिमाचलमध्ये आतापर्यंत फक्त सामान्य पाऊस झाला आहे. मात्र कमी वेळेत जास्त पाऊस झाल्याने नैसर्गिक घटना वाढल्या आहेत.

वाळवंटात मुसळधारअधिकाऱ्यांनी सांगितले की, 20 ऑगस्टपर्यंत राजस्थानमधील 716 धरणे त्यांच्या क्षमतेच्या 76% पाण्याने भरली आहेत. गेल्या वर्षी या तारखेपर्यंत केवळ 57 टक्के पाणी भरले होते. यंदा एवढा पाऊस पडल्याने पुढील वर्षी पाण्याची कमतरता भासणार नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यावर्षी 23 ऑगस्टपर्यंत राजस्थानमध्ये सामान्यपेक्षा 51% जास्त पाऊस झाला आहे. येथील एकही जिल्हा कोरडा नाही. ओडिशात काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरापासून दिलासा मिळालेला नाही. नद्यांची पातळी कमी होत आहे, मात्र तरीही 902 गावांतील साडेसहा हजार लोक बाधित आहेत. राज्यातील जवळपास सर्वच नद्या धोक्याच्या पातळीखाली वाहत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :RainपाऊसfloodपूरRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेशUttar Pradeshउत्तर प्रदेश