याँगॉन : म्यानमारमधील पुराने २७ जणांचा बळी घेतला असून, या भीषण पुराचा फटका १,१४,८४५ लोकांना बसला आहे. जुलै महिन्यात झालेल्या जबरदस्त पावसामुळे १२ प्रांतांत व ४२ गावांत पूरस्थिती आहे. पाऊस व पुरामुळे घरे व कृषी क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. म्यानमारच्या अयवादी, चिंदविन, थानलीन , सितुंग, नागॉन या नद्या धोकादायक पातळीवरून वाहत आहेत. संयुक्त राष्ट्राच्या मदत संघटना व एनजीओ पूरग्रस्तांना मदत करीत आहेत. (वृत्तसंस्था)
म्यानमारमधील पुराचा १ लाख लोकांना फटका
By admin | Published: August 02, 2015 10:26 PM