फुले मार्केटच्या जागेची सनद सापडली जागा मनपाचीच: कागदपत्रांचा आधार
By admin | Published: January 02, 2016 8:31 AM
जळगाव : शहरातील फुले व सेंट्रल फुले मार्केटची जागा मनपाचीच असल्याची फाईल व त्या संदर्भातील सनद मनपा प्रशासनास सापडली असून ही जागा शासनाची नसून मनपाचीच असल्याचा दावा याव्दारे प्रशासन करणार आहे.
जळगाव : शहरातील फुले व सेंट्रल फुले मार्केटची जागा मनपाचीच असल्याची फाईल व त्या संदर्भातील सनद मनपा प्रशासनास सापडली असून ही जागा शासनाची नसून मनपाचीच असल्याचा दावा याव्दारे प्रशासन करणार आहे. शहरातील विविध व्यापारी संकुलांच्या कराराची मुदत संपल्याने संकुलांमधील गाळे घेण्यासाठी महापालिकेने २०१४ मध्ये ठराव क्रमांक १३५ केला होता. या कराराला व्यापार्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आव्हान दिले होते. दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून मुख्यमंत्र्यांनी ठराव क्रमांक १३५ च्या अंमलबजावणीस स्थगिती देऊन याप्रश्नी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे सुनावणीचे आदेश केले होते. नगरविकास राज्यमंत्र्यांनी त्यावर सुनावणी घेऊन मनपा व व्यापार्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. त्यानंतर त्यांनी याप्रश्नी निर्णय दिला. १८ पैकी १४ गाळे मनपाच्या मालकेचे असल्याने त्यांच्याबाबत मनपाने निर्णय घ्यावा व चार व्यापारी संकुलांची उभारणी ही शासनाच्या जागेवर असल्याने त्याबाबत शासनाने निर्णय घ्यावा असे राज्यमंत्री पाटील यांनी आदेश केले होते. फाईची शोधाशोधदरम्यान, चार मार्केटमध्ये फुले व सेंट्रल फुले मार्केटचाही समावेश असल्याने या मार्केटशी संबंधित मूळ कागदपत्रांच्या फाईलचा शोध मनपा प्रशासनातर्फे घेण्यात येत होता. त्यानुसार जागांशी संबंधित मूळ सनद आता प्रशासनास सापडली असून त्यावर मालकी हक्क हा महापालिकेचाच असल्याचे लक्षात येते. त्यामुळे या जागांवरही आता मनपा प्रशासन दावा करणार आहे.