नव्या संसद भवनच्या उद्घाटनावरून राजकीय गोंधळ सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार, २८ मे रोजी संसद भवनाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. आता यावरुन राजकीय वाताावरण तापले आहे. जेव्हा आपल्या देशात सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव येतो, तेव्हा संसदेत बहुमत तपासण्यासाठी फ्लोअर टेस्ट घेतली जाते. आता आपण पाहूया आकडेवारीनुसार किती खासदार समर्थन देतील तर किती विरोध करतील. विरोधी पक्षांनी एकजुटीने उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. त्याचबरोबर एनडीएमध्ये सहभागी पक्षांसह सुमारे दोन डझन पक्षांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे.
आम्ही केजरीवालांच्या पाठीशी, ही वेळ वाद घालण्याची नाही; पवार राज्यसभेत पाठिंबा देणार
यामध्ये बहिष्कार घालणारे प्रबळ आहेत की उद्घाटनाला पाठिंबा देणारे हे पाहावे लागेल. संसदेची दोन सभागृहे आहेत. पहिल्या लोकसभेवर नवीन संसदेची आकडेवारी पाहूया. आत्तापर्यंतच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की ३७६ खासदार म्हणजेच ६८ टक्के लोकसभेचे खासदार नवीन संसदेच्या उद्घाटनाला पाठिंबा देत आहेत, तर विरोधी पक्षाचे १६८ लोकसभा खासदार म्हणजेच ३१ टक्के खासदारांनी संसदेच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकला आहे.
नवीन संसदेवर राज्यसभेची आकडेवारी पाहिली तर तर १३१ राज्यसभेचे खासदार म्हणजे ५५ टक्के समर्थनात आणि १०४ राज्यसभेचे खासदार म्हणजे ४५ टक्के विरोध करत आहेत.
२५ पक्षांना निमंत्रण मंजूर करण्यात आले आहे आणि आता देशातील राज्यांच्या कारभाराच्या आधारे फ्लोर टेस्ट केली जाते, त्यानंतर ज्या पक्षांना पाठिंबा आहे, त्यांचे एकूण १८ राज्यांमध्ये सरकार आहे. म्हणजेच ६० टक्के राज्यांमध्ये समर्थक पक्षांची सत्ता आहे. १२ राज्यांमध्ये म्हणजेच ४० टक्के विरोधी पक्षांचे सरकार आहे. पक्षांच्या आधारे फ्लोर टेस्ट पाहता, २५ पक्षांनी निमंत्रण स्वीकारले आहे आणि उद्घाटनाला पाठिंबा देत आहेत.