चढउतार येतातच; खचून जाऊ नका!
By admin | Published: August 26, 2015 12:18 AM
हॉकीप? विरेन रास्किन्हाने दिला गुरुमंत्र : चौगुले महाविद्यालयाचा सहावा संस्थापनदिन उत्साहात
हॉकीप? विरेन रास्किन्हाने दिला गुरुमंत्र : चौगुले महाविद्यालयाचा सहावा संस्थापनदिन उत्साहातमडगाव : आयुष्याच्या वाटेवर चढउतार येतात. अपयशातच यशाची गुरुकिल्ली दडून बसली आहे. कधीही खचून न जाता मार्गक्रमण करत राहा. यश नक्की मिळेल, असा संदेशवजा गुरुमंत्र भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार व अर्जुन पुरस्कार विजेते विरेन रास्किन्हा याने विद्यार्थ्यांना दिला. निमित्त होते ते येथील चौगुले महाविद्यालयाच्या 6 व्या संस्थापनदिनाचे. मंगळवारी महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात हा सोहळा मोठय़ा उत्साहात साजरा झाला. चौगुले उद्योगसमूहाचे अध्यक्ष विजय चौगुले, महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार सावंत उपस्थित होते.विरेन म्हणाला, आज जे खेळाडू यशोशिखरावर आहेत, त्या यशामागे त्यांचे कष्ट आहेत. ध्येयाचा पाठलाग करत असताना अडचणी येतातच, म्हणून खचून न जाता मार्गक्रमण करत राहावे. यश तुमच्या वाट्याला नक्की येईल. कोणत्याही खेळाडूला विजयासाठी मैदानावर झुंजणे आवश्यक असते. मात्र, त्याच वेळी त्याने केलेली एक चूक किती महागडी पडते हे विरेनने उदाहरण देऊन सांगितले. तो म्हणाला, 2004 साली ऑस्ट्रेलिया संघाविरुध्दच्या सामन्यात शेवटच्या क्षणाला जी चूक झाली, त्यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला. ही सल अजूनही बोचत आहे. या सामन्यात शेवटच्या काही सेकंदांत ऑस्ट्रेलिया संघाने गोल नोंदवत भारतावर 4-3 असा निसटता विजय मिळवला होता. मेरी कोम, सायना यांचा आदर्श महिला बॉक्सिंगपटू मेरी कोम हिने जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर बॉक्सिंगमध्ये पदार्पण केले होते. 2012 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिने देशाला कांस्यपदक मिळवून दिले. तिच्यातील ही जिद्द अवघ्या जगाने पाहिली आहे. तसेच विश्वात प्रथम क्रमांकावर असलेली बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिची एकाग्रता व फिटनेस वाखाणण्याजोगा आहे. या दोन्ही खेळाडूंनी आज आदर्श निर्माण केला आहे.