शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

बाप-लेकीची सोबत लढाऊ विमान भरारी; भारतीय हवाई दलातील पहिलीच अनोखी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2022 9:20 AM

फ्लाइंग ऑफिसर अनन्या शर्मा या २०२१मध्ये भारतीय हवाई दलात रुजू झाल्या. त्यांनी सांगितले की, माझे वडील व एअर कमोडोर संजय शर्मा यांच्याकडे पाहून मलाही पायलट होण्याची इच्छा होती.

नवी दिल्ली : फायटर पायलट असलेल्या पिता-पुत्री या दोघांनी मिळून लढाऊ विमान चालवण्याची भारतीय हवाई दलाच्या इतिहासातील पहिलीच घटना नुकतीच घडली. कर्नाटकातील बिदर येथे फ्लाइंग ऑफिसर अनन्या शर्मा हिने आपले वडील व एअर कमोडोर संजय शर्मा यांच्यासमवेत हवाई दलाचे हॉक-१३२ हे लढाऊ विमान उड्डाण केले.

फ्लाइंग ऑफिसर अनन्या शर्मा या २०२१मध्ये भारतीय हवाई दलात रुजू झाल्या. त्यांनी सांगितले की, माझे वडील व एअर कमोडोर संजय शर्मा यांच्याकडे पाहून मलाही पायलट होण्याची इच्छा होती. लहानपणापासूनच विमाने, हवाई दल यांचे आकर्षण होते. खूप कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊन हवाई दलात प्रवेश मिळाल्याने मला अतिशय आनंद झाला. अनन्या सध्या लढाऊ विमान उडविण्याचे बिदर येथे प्रशिक्षण घेत आहेत. त्याच दरम्यान त्यांना आपले वडील संजय शर्मा यांच्यासोबत लढाऊ विमान चालवण्याची संधी मिळाली. भारतीय हवाई दलामध्ये २०१६ साली तीन महिला फायटर पायलट म्हणून रुजू झाल्या. त्यांच्यापासून अनन्या शर्मा यांनी प्रेरणा घेतली. त्यानंतर पाच वर्षांनी अनन्या यांचेही स्वप्न पूर्ण झाले  आहे.

...आई, मुलीनेही घडविला होता इतिहासअमेरिकेतील स्काय वेस्ट एअरलाइन्ससाठी आई व मुलीने मिळून २०२० साली मातृदिनाच्या निमित्ताने एक प्रवासी विमान उडविले होते.  कॅप्टन सुझी गॅरेट यांना प्रवासी विमान उडविण्याचा ३२ वर्षांचा अनुभव आहे. त्या व त्यांची पुत्री डोना गॅरेट या दोघींनी मिळून विमान उड्डाण करून नवा इतिहास घडविला होता.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी