नवी दिल्ली: सतत वाढत जाणारी लोकसंख्या आणि त्यामुळे रस्त्यावर होणाऱ्या जाममुळे दररोज आपल्याला विविध अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे अनेक वेळा ऑफिससह अनेक महत्वाच्या कामांसाठी वेळेवर पोहोचण्यास उशीर होतो. पण, आता लवकरच या समस्येतून सुटका होऊ शकते. देशात पहिल्या हायब्रीड फ्लाइंग कारचे मॉडेल तयार झाले आहे.
ज्योतिरादित्य शिंदेंनी दिली माहिती
केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विट करून आशियातील या पहिल्या हायब्रीड फ्लाइंग कारच्या मॉडेलविषयी माहिती दिली आहे. चेन्नईतील तरुणांच्या एका स्टार्टअपने या आशियातील पहिल्या हायब्रीड फ्लाइंग कारचे मॉडेल सादर केलं आहे.
या कामांसाठी केला जाऊ शकतो वापर
ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विट करत म्हटले की, हायब्रीड फ्लाइंग कारचा वापर माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी केला जाईल. तसेच, भविष्यात वैद्यकीय क्षेत्रात याची खूप मदत होऊ शकते. आपत्कालीन परिस्थितीत लोकांचे प्राणही याद्वारे वाचू शकतात.
कारमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंससह डिजीटल इंस्ट्रूमेंटविनता एअरोमोबिलिटीने तयार केलेलं हे मॉडेल 5 ऑक्टोबरला लंडनमध्ये होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या हेलिटेक प्रदर्शनात सादर केलं जाईल. विनता एअरोमोबिलिटीचा दावा आहे की, या हायब्रीड फ्लाइंग कारमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंससह डिजीटल इंस्ट्रूमेंट पॅनलदेखील असेल.
1300 किलो वजन उचलण्याची क्षमताया हायब्रीड फ्लाइंग कारचं वजन 1100 किलोग्राम असेल आणि तर 1300 किलो वजन उचलण्याची क्षमता या कारची असेल. विनता एअरोमोबिलिटीच्या फ्लाइंग कारला दोन प्रवाशांसाठी तयार केलं असून, 100-120 किलोमीटर प्रती तासांच्या वेगानं ही कार उडू शकेल. याशिवाय, कंपनीनं जास्तीत-जास्त उडण्याची वेळ 60 मिनीट आणि उंची 3000 फूट असेल, असा दावा केला आहे.