शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

LOC वर पाकिस्तानचा हल्ला लष्कराने पाडला हाणून, BAT च्या दोन कमांडोंना कंठस्नान 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 9:19 AM

नववर्षापूर्वी भारतात घुसून दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे.

ठळक मुद्देनववर्षापूर्वी भारतात घुसून दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला नौगाम विभारातील नियंत्रण रेषेवर लष्कराने पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (BAT) च्या कारवायांना सुरुंग लावताना दोन घुसखोरांना ठार मारलेमोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त

श्रीनगर -  नववर्षापूर्वी भारतात घुसून दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तानी सैन्य आणि घुसखोरांचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला आहे. रविवारी नौगाम विभारातील नियंत्रण रेषेवर लष्कराने पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (BAT) च्या कारवायांना सुरुंग लावताना दोन घुसखोरांना ठार मारले. तसेच मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी BAT ची पथके मोठ्या प्रमाणात दारुगोळा घेऊन नियंत्रण रेषेजवळील जंगलात येत आहेत. तसेच त्यांना कव्हर करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार करण्यात येत आहे. 

 एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी भारतीय लष्कराने पाकिस्तानी BAT पथकाचा हल्ला परतवून लावला. तसेच या कारवाईत पाकिस्तानी सैन्याच्या दोन जवानांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तसेच त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे  आणि दारुगोळा जप्त करण्यात आळा आहे. ठार मारण्यात आलेल्या घुसखोरांनी लष्करी गणवेश परिधान केला होता. तसेच त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर सामान होते. तसेच शस्त्रास्त्रेही होती. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले सामान पाहता ते भारतीय लष्कराच्या चौकीवर हल्ला करण्याच्या इराद्याने आले होते, हे स्पष्ट होते, अशे लष्कराकडून सांगण्यात आले. 

या घुसखोरांना भारतात घुसण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून मदत देण्यात येत होती. त्यामुळे त्यांचे मृतदेह पाकिस्तानने परत न्यावेत, असे आवाहन करण्यात येणार असल्याचेही लष्कराकडून सांगण्यात आले.  

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी