साधुग्राममधील खालशातील भोजनाची अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी
By admin | Published: September 10, 2015 4:46 PM
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात अनेक खालशात आणि सेवाभावी संस्थेच्या तंबंूमध्ये अन्नछत्र व भंडारे सुरू असून, भाविक, साधू महंत यांना सुरक्षित व सकस अन्न उपलब्ध व्हावे, या उद्देशाने अन्न व औषध पथकाकडून अन्न तपासणी करण्यात येत आहे.
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात अनेक खालशात आणि सेवाभावी संस्थेच्या तंबंूमध्ये अन्नछत्र व भंडारे सुरू असून, भाविक, साधू महंत यांना सुरक्षित व सकस अन्न उपलब्ध व्हावे, या उद्देशाने अन्न व औषध पथकाकडून अन्न तपासणी करण्यात येत आहे.अन्न व औषध प्रशासनाकडून अन्न व्यवसायातील उत्पादक, घाऊक व किरकोळ विक्रेते, स्टॉलधारक यांच्याकडील अन्न व खाद्य पदार्थांची तपासणी करण्यात आली. तसेच खाद्य तेल, पीठ, मैदा, रवा, बेसन, वनस्पती तूप, तेल, मिठाई आदिंचे सुमारे ५०० नमुने घेण्यात आले. तसेच काही ठिकाणी साठा जप्त करून दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली. यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे ५ पथके तयार करण्यात आली असून, यात २0 अधिकारी कार्यरत आहेत. अन्न व औषध प्रशासनाने महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवकांना या कामी प्रशिक्षण दिले असून, त्यांच्या मदतीने आतापर्यंत विविध खालसे, सेवाभावी अन्नक्षेत्रे आदिंच्या सुमारे ७५० ठिकाणी भेटी देऊन प्रसादाचे नमुने तपासण्यात आले. (प्रतिनिधी)