आगरतळा : मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळून देशाशी संपर्काचा मुख्य मार्ग असलेला राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ गेला महिनाभर ठप्प झाल्याने त्रिपुरा राज्याला अन्नधान्य, इंधन व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बांगलादेशमार्गे सुुरु करण्यात आला.दोन्ही देशांमधील अंतर्गत जलमार्गांचा व्यापार व वाहतुकीसाठी वापर करण्यासंबंधीचा सुधारित करार गेल्या वर्षी जूनममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश भेटीत करण्यात आला. अलीकडेच बांगलादेशने या कराराची अंमलबजावणी सुरु केली. त्रिपुरा सरकारने केंद्राला विनंती केल्यानंतर आता या कराराचा आधार घेऊन त्रिपुरात पाठवायच्या जीवनावश्यक वस्तू बांगलादेशमार्गे येण्यास सुरुवात झाली आहे. (वृत्तसंस्था)
त्रिपुराला बांगलादेशमार्गे अन्न व इंधनाचा पुरवठा
By admin | Published: July 04, 2016 4:16 AM