बचतीच्या पैशातून अनाथांना भोजन
By admin | Published: December 10, 2015 11:57 PM
पिंपळवंडीच्या तरुणांचा अभिनव उपक्रम :
पिंपळवंडीच्या तरुणांचा अभिनव उपक्रम : पिंपळवंडी : येथील पिंपळेश्वर मित्र मंडळामधील तरुणांनी बचत केलेल्या पैशांमधून अनाथ व मतिमंद मुलांना मिष्टान्न भोजन दिले. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडुन कौतुक होत आहे.काकडपा शिवारातील तरुणांनी पिंपळेश्वर मित्र मंडळ स्थापन केले आहे. या माध्यमातून ते विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहेत. या उपक्रमांपैकीच एक उपक्रम म्हणून मंडळाच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन पैशांची बचत केली. या बचतीमधून मंडळाच्या सर्व सदस्यांनी नगर जिल्ातील कर्जत तालुक्यात असलेल्या टाकळी खंडेश्वर या अतिदुर्गम ठिकाणी हरिओम निराधार विद्यालयात जाऊन त्या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या अनाथ व मतिमंद मुलांना मिष्टान्न भोजन दिले. या उपक्रमात मंडळाचे अध्यक्ष गोविंद शिंगोटे, गोविंद काकडे, रोहन काकडे, अनिल काकडे, सूरज काकडे, भानुदास काकडे, स्वप्नेश काकडे, राहुल काकडे, सचिन काकडे, चेतन थोरात यांनी सहभाग घेतला. फोटो मजकूर - १) हरिओम निराधार विद्यालयातील अनाथ मुले जेवण करताना.२) अनाथ मुलांसमवेत पिंपळेश्वर मित्र मंडळाचे कार्यकर्ते.