सलग दुसऱ्या दिवशी ED कडून राहुल गांधींची १० तास चौकशी, बुधवारी पुन्हा बोलावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 12:05 AM2022-06-15T00:05:34+5:302022-06-15T00:06:07+5:30
Rahul Gandhi ED : नॅशनल हेराल्ड प्रकरणी बुधवारी तिसऱ्या दिवशीही राहुल गांधींची चौकशी होणार.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी सक्तवसूली संचलनालयानं सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांची चौकशी केली. दुसऱ्या दिवशी सलग दहा तास त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, बुधवारी त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
ईडीनं सलग तिसऱ्या दिवशीही राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावलं असल्याची माहिती वृत्तसंस्था एएनआयनं दिली आहे. दुसऱ्या दिवशीही त्यांच्या चौकशीदरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलनं करण्यात आली. तसंच अनेकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे. राहुल गांधी सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी ११.०५ वाजता एपीजे अब्दुल कलाम रोडवरील ईडीच्या मुख्यालयात पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांची बहीण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधीही होत्या.
Enforcement Directorate asks Congress leader Rahul Gandhi to rejoin the National Herald investigation tomorrow for the third consecutive day: Sources
— ANI (@ANI) June 14, 2022
(file pic) pic.twitter.com/a2vpzyqtCt
#WATCH | Congress leader Rahul Gandhi leaves the Enforcement Directorate (ED) office in Delhi after the second consecutive day of questioning in the National Herald case. pic.twitter.com/elLq9HBNVM— ANI (@ANI) June 14, 2022
कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर सकाळी ११.३० वाजता राहुल गांधींची चौकशी सुरू करण्यात आली. सुमारे चार तासांच्या चौकशीनंतर दुपारी साडेतीन वाजता राहुल गांधी बाहेर आले आणि तासाभरानंतर पुन्हा ईडी कार्यालयात पोहोचले, असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सोमवारीदेखील ईडीनं त्यांनी चौकशी केली. त्यानंतर मंगळवारी पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. दरम्यान, पक्षाचे संघटन महासचिव केसी वेणुगापाल यांनी एक व्हिडीओ जारी केला होता. “नरेंद्र मोदी सरकार तपास यंत्रणांचा दुरूपयोग करत आहे. काँग्रेसच्या नेत्यांविरोधात सुडाचं राजकणार करत कारवाई केली जात आहे. काँग्रेस सत्यासोबत आहे आणि आम्ही घाबरणार नाही,” असंही ते म्हणाले होते.