नॅशनल हेराल्ड प्रकरणी सक्तवसूली संचलनालयानं सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांची चौकशी केली. दुसऱ्या दिवशी सलग दहा तास त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, बुधवारी त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
ईडीनं सलग तिसऱ्या दिवशीही राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावलं असल्याची माहिती वृत्तसंस्था एएनआयनं दिली आहे. दुसऱ्या दिवशीही त्यांच्या चौकशीदरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलनं करण्यात आली. तसंच अनेकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे. राहुल गांधी सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी ११.०५ वाजता एपीजे अब्दुल कलाम रोडवरील ईडीच्या मुख्यालयात पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांची बहीण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधीही होत्या.