शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

राजीनामा देण्यास भाग पाडले!

By admin | Published: February 08, 2017 1:36 AM

तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी पक्ष प्रमुख व्ही. के. शशिकला यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री बंडाचे निशाण फडकाविले

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी पक्ष प्रमुख व्ही. के. शशिकला यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री बंडाचे निशाण फडकाविले. मला पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले आहे. तामिळनाडूची जनता, अद्रमुक कार्यकर्ते आणि आमदारांची इच्छा असेल तर मी राजीनामा मागे घेईन, असे सांगून पनीरसेल्वम यांनी बॉम्बगोळा टाकला. त्यांच्या या पवित्र्याने तामिळनाडूतील राजकीय घटनाक्रमाला वेगळे वळण मिळाले आहे.

दिवंगत जयललिता यांच्या मरिना येथील समाधीस्थळी रात्री ४० मिनिटे ध्यानमुद्रेत बसून पन्नीरसेल्वम यांनी राज्यासह देशाचे लक्ष्य वेधून घेतले. पक्षाच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग प्रशस्त व्हावा यासाठी पनीरसेल्वम यांनी पदाचा राजीनामा दिला होता. राज्यपालांनी पनीरसेल्वम यांचा राजीनामा स्वीकारला. तथापि, नवे सरकार स्थापन होईपर्यंत मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहण्यास सांगितले आहे.

पन्नीरसेल्वम म्हणाले वरदा येथील परिस्थिती मी यशस्वीरित्या हाताळल्यामुळे शशीकला यांना राग आला होता. जलिकट्टू माझ्यासाठी मोठा विजय होता केंद्र सरकारशी सतत चर्चा करून मी तो खेळ मिळवण्यात यशस्वी ठरलो,असे ते म्हणाले.केवळ लोकप्रिय नेताच मुख्यमंत्री बनू शकतो, असे म्हणून पन्नीरसेल्वम यांनी शशीकला यांचे आव्हान स्वीकारले आहे. जयललिता यांचा आत्मा माझ्याशी बोलला, असे सांगून पनीरसेल्वम म्हणाले की, ‘‘जयललितांचा आत्मा म्हणाला की काही सत्य तमिळनाडुच्या लोकांना सांग.’’ ते म्हणाले की जयललिता मला म्हणाल्या होत्या की लोकांना जो स्वीकारार्ह आहे अशा कोणा एकाची निवड करा.पनीरसेल्वम रात्री नऊ वाजता जयललितांच्या समाधीस्थळी पोहोचले.

पक्ष कार्यकर्ते किंवा सुरक्षा यंत्रणांना याचा थांगपत्ताही नव्हता. समाधीजवळ ते ४० मिनिटे ध्यानमुद्रेत होते. ९ वाजून ४० मिनिटांनी ध्यानमुद्रेतून बाहेर येऊन त्यांनी समाधीस्थळाला प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर ते पत्रकारांना सामोरे गेले. अद्रमुकसाठी मंगळवार हा प्रचंड राजकीय उलथापालथीचा दिवस ठरला. पन्नीरसेल्वम यांच्या बंडाच्या पवित्र्यापूर्वी पक्षाचे संस्थापक सदस्य पी. एच. पांडियन यांनी जयललितांचा मृत्यू आणि शशिकला यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून बॉम्ब टाकला होता. त्यानंतर दुपारी जयललिता यांची भाची दीपा जयकुमार यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती.

तमिळनाडूतील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव हे चेन्नईला मंगळवारी किंवा बुधवारी रवाना होतील, असे राजभवनच्या सूत्रांनी सांगितले. राव यांच्याकडे तमिळनाडुच्या राज्यपालपदाचीही जबाबदारी आहे. अ. भा. राज्यपाल विद्यासागर राव सोमवारी रात्री दिल्लीहून चेन्नईला जाण्याऐवजी मुंबईला आल्यामुळे शशिकला यांचा ताबडतोब शपथविधी होईल ही शक्यताही विरळ झाली. बेहिशेबी मालमत्येच्या खटल्यात शशीकला यांच्याबाबतचा निवाडा लवकरच दिला जाईल, असे संकेत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले होते.