नोकरी-व्यवसायाच्या शोधात परदेशी स्थलांतर करणाऱ्या नागरिकांची संख्या कोणत्या देशात सर्वाधिक असेल?- या प्रश्नाचे ताजे उत्तर आहे - अर्थातच - भारत! आपल्या देशातल्या उच्च दर्जाच्या गुणवत्तेला जगाने दारे उघडलेली असल्याने जगात सर्वाधिक डायास्पोरा - म्हणजे विदेशी वास्तव्य करणारे भारतीय वंशाचे नागरिक- हा मान आपल्या देशाकडे जातो. २०२० साली सुमारे १ कोटी ७९ लाख (भारतात जन्मलेले) नागरिक विविध देशांत राहात असल्याची संयुक्त राष्ट्रसंघाची ताजी आकडेवारी आहे. त्यानंतर नंबर लागतो तो मेक्सिको आणि रशियाचा ! २००० ते २०२० या गेल्या वीस वर्षांत भारताने या दोन्ही देशांना मागे टाकले आहे. युद्धग्रस्त सीरियन लोकांची रानोमाळ अवस्थाही सोबतच्या आलेखात स्पष्ट दिसते.
परदेशी उडालेले पक्षी कोणत्या देशातले?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 10:08 AM