गुंतवणुकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास डगमगला; प्रियंका गांधींचा मोदी सरकारला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 03:48 PM2019-09-18T15:48:50+5:302019-09-18T15:52:42+5:30
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तसेच टेक्सासमधील ह्युस्टन येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. मोदी यांच्या या कार्यक्रमावरून प्रियंका गांधी यांनी मोदींवर टीका केली आहे. परदेशात कार्यक्रम प्रायोजित करून गुंतवणुकदार येत नाही. गुंतवणुकदारांचा विश्वास डगमगला आहे असं प्रियंका यांनी म्हटलं आहे.
'झगमगाट दाखवून आणि रोज पाच ट्रिलियन- पाच ट्रिलियन बोलून किंवा माध्यमांच्या हेडलाईन मॅनेज केल्याने आर्थिक सुधारणा होत नाहीत. परदेशात कार्यक्रम प्रायोजित करून गुंतवणुकदार येत नाही. गुंतवणुकदारांचा विश्वास डगमगला आहे' असं ट्वीट प्रियंका गांधी यांनी बुधवारी (18 सप्टेंबर) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केलं आहे.
चकाचौंध दिखा कर रोज 5 ट्रिलियन-5 ट्रिलियन बोलते रहने या मीडिया की हेडलाइन मैनेज करने से आर्थिक सुधार नहीं होता। विदेशों में प्रायोजित इवेंट करने से निवेशक नहीं आते। निवेशकों का भरोसा डगमगा चुका है। आर्थिक निवेश की जमीन दरक गई है। #BjpBadForBusinesshttps://t.co/G1YvZRrvvD
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 18, 2019
प्रियंका गांधी यांनी यासोबतच आणखी एक ट्वीट केलं आहे. यामध्ये 'भाजपा सरकार मात्र या सत्याचा स्वीकार करत नाही. आर्थिक महाशक्तीच्या दिशेने जात असताना मंदीचा गतिरोधक लागला आहे. यात सुधारणा न करता झगमगाट काही कामाचा नाही' असं म्हटलं आहे. तसेच यासोबतच मंदीकीमार हा हॅशटॅगही वापरला आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी प्रियंका यांनी क्रिकेट मॅचचा व्हिडीओ पोस्ट करून मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता.
मगर भाजपा सरकार इस सच्चाई को स्वीकार नहीं कर रही। आर्थिक महाशक्ति बनने की दिशा में ये मंदी ‘स्पीड ब्रेकर’ है, इसको सुधारे बिना सब रंग-रोगन बेकार है। #मंदीकीमार
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 18, 2019
क्रिकेट मॅचमधील कॅचचा व्हिडिओ पोस्ट करुन मोदी सरकारवर टीका केली होती. 'क्रिकेट या खेळात जेव्हा कॅच पकडायचा असतो तेव्हा चेंडूवर नजर आणि खेळ खेळण्याची भावना मनात असणं गरजेचं आहे. कॅच सुटला म्हणून गुरुत्वाकर्षण, गणित आणि ओला-उबर अशी कारणं द्यायची नसतात' असं म्हणत प्रियंका गांधी यांनी एक व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केला होता. यासोबतच भारतीय अर्थव्यवस्थेसाठी जनहितार्थ जारी असं देखील त्यांनी म्हटलं होतं.
प्रियंका गांधी यांनी याआधीही मोदी सरकारच्या वाईट कामगिरीमुळे देशात आर्थिक मंदी आली आहे अशी टीका केली होती. तसेच ऐतिहासिक स्वरुपाची मंदी आल्याचे सरकारने कबुल करावे असेही त्यांनी म्हटले होते. देशात मंदी आल्याचे व तिचा सामना करण्यासाठी सरकार उपाययोजना करत असल्याचे प्रत्येक जण पाहतो आहे. मात्र तरीही मोदी सरकार खरी वस्तुस्थिती सांगण्यास तयार नाही. प्रसारमाध्यमांद्वारे खोटे चित्र रंगवून सरकारला सत्य फार काळ झाकता येणार नाही. शेकडो वेळा खोटे बोलले की ती गोष्ट कालांतराने लोकांना खरी वाटायला लागते असे प्रत्येक वेळेस होत नाही. जून महिन्याअखेर संपलेल्या तिमाहीत देशाचा जीडीपी विकासदर 5 टक्क्यांपर्यंत खाली घसरला. या दरात गेल्या सहा वर्षांत इतकी घसरण कधीही झाली नव्हती. देशामधील वाहननिर्मिती क्षेत्राला मंदीचा मोठा फटका बसला असल्याचं प्रियंका गांधी यांनी म्हटलं होतं.