नवी दिल्ली - युक्रेनबाबतच्या भारताच्या भूमिकेवर टीका करणाऱ्यांना परराष्ट्र मंत्र्यांनी खडेबोल सुनावले आहे. तसेच पाश्चात्य देशांना आशियासमोरील आव्हानांची माहिती नाही आहे. ज्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये गेल्या वर्षी घडलेल्या घटना आणि आपल्या धोरणांमुळे क्षेत्रातील विविध देशांवर सातत्याने दबाव निर्माण होत आहे. रायसिना डायलॉगमध्ये एका संवादात्मक सत्रामध्ये परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सांगितले की, युक्रेनमध्ये निर्माण झालेले संकट हे युरोपसाठी एक सतर्क राहण्याचा इशारा देणार संदेश आहे.
युक्रेनमधील परिस्थितीबाबत नॉर्वेचे परराष्ट्रमंत्री एनिकेन हुइटफेल्ड यांच्या एका विशिष्ट्य प्रश्नाचं उत्तर देताना जयशंकर यांनी सांगितले की, भारत ही लढाई तात्काळ समाप्त व्हावी आणि दोन्ही देशांनी मुत्सद्देगिरी आणि चर्चेच्या वाटेवर यावे यासाठी दबाव टाकत आहे. त्यांनी सांगितले की, मला वाटते की, जिथे युक्रेनमधील संघर्षाचा संबंध आहे. आमच्याजवळ एक स्पष्ट स्थिती आहे, तसेच त्याबाबत आम्ही आधीही स्पष्ट केलेले आहे.
जयशंकर यांनी सांगितले की, तुम्ही युक्रेनबाबत मुद्दा मांडला. मला आठवतंय की, एक वर्षभरापूर्वी अफगाणिस्तानमध्ये काय झालं होतं. तिथे संपूर्ण समाजाला जगाने आपल्या स्वार्थासाठी नरकात ढकलले. त्यांनी पुढे सांगितले की. मी खूप प्रामाणिकपणे सांगतो की, आम्ही सर्वजण आपला विश्वास आणि आवडींमध्ये आपल्या अनुभवाचा योग्य ताळमेळ शोधला पाहिजे. सर्वजण याला आपापल्या दृष्टिकोनातून पाहतात. सर्व देशांचे प्राधान्यक्रम वेगळे आणि ते तसे असणं स्वाभाविक आहे, असे जयशंकर यांनी सांगितले.