शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
2
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
3
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
4
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
5
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
6
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
7
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
8
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
9
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
10
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
11
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
12
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
13
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
14
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
15
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
16
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
17
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
18
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
19
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
20
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा

परराष्ट्र सचिव विजय गोखलेंसमोर अनेक आव्हाने, मुत्सद्दीपणाचा लागणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 2:10 AM

डोकलामच्यावरून चीनशी सुरू असलेला ७३ दिवसांचा वाद सोडविण्यात महत्वाची भूमिका पार पाडणारे मुत्सद्दी आणि अनुभवी परराष्ट्रविषयक तज्ज्ञ विजय गोखले यांनी सोमवारी परराष्ट्र सचिवपदाचा पदभार स्वीकारला. चीनसह शेजारी देशांशी संबंध सुधारण्याचे मोठे आव्हान विजय गोखले यांच्यापुढे आहे.

नवी दिल्ली : डोकलामच्यावरून चीनशी सुरू असलेला ७३ दिवसांचा वाद सोडविण्यात महत्वाची भूमिका पार पाडणारे मुत्सद्दी आणि अनुभवी परराष्ट्रविषयक तज्ज्ञ विजय गोखले यांनी सोमवारी परराष्ट्र सचिवपदाचा पदभार स्वीकारला. चीनसह शेजारी देशांशी संबंध सुधारण्याचे मोठे आव्हान विजय गोखले यांच्यापुढे आहे.शेजारी देशांशी संबंध सुधारण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. भारत आणि पाकिस्तानात तणाव कायम आहे. दक्षिण आशियातील मालदीव हा असा एकमेव देश आहे जिथे अद्याप मोदी यांनी दौरा केलेला नाही. चीनशी संबंध हळूहळू सुधारत आहेत. नेपाळशी संबंधही फारसे अनुकूल नाहीत किंवा ते चुकीच्या मार्गाने चाललेले आहेत.भूतानमध्ये पुढील वर्षी निवडणुका होत आहेत. बांंग्लादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यासोबतचे संबंध कायम राहिले तरी, भारत - पाकिस्तानमधील संबंधातील गुंतागुंत कायम राहू शकते. त्यामुळे परराष्ट्र धोरणाकडे मोदी यांनी विशेष लक्ष दिल्याचे दिसून येते. मात्र, त्यांची व्यक्तिगत शैली जोखीम असलेली आहे. राष्ट्रीय सुरक्षा, गुंतवणूक, तंत्रज्ञानाचे हस्तांतरण, कौशल्य विकास हे सरकारचे निवडणुकीचे मुद्दे असतील.आखती देशांशी चांगले संबंधअमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पॅरिस करारातून घेतलेली माघार असो की, जेरुसेलमला इस्रायलची राजधानी जाहीर केल्याचे प्रकरण असो, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अशा अनेक घडामोडी घडत असताना त्याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटत आहेत. मोदी सरकारने आखाती देशांशी संबंधातही चांगली सुधारणा केली आहे.या भागात ७ लाख भारतीय राहतात. संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांच्याशीही संबंधात सुधारणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र धोरण आगामी काळातकोणते वळण घेते ते भविष्यात स्पष्ट होणार आहे. त्यासाठी विजय गोखले यांच्या मुत्सद्दीपणाचा मात्र कस लागणार आहे.

टॅग्स :Vijay Gokhaleविजय गोखलेIndiaभारतGovernmentसरकार