हृषीकेश (उत्तराखंड) : लॉकडाऊनमध्ये गावात विनाकारण फिरणाऱ्या किमान १० विदेशी पर्यटकांना ‘मी लॉकडाऊनचे पालन केले नाही, मला माफ करा’ असा माफीनामा ५०० वेळा लिहिण्याची शिक्षा करून पोलिसांनी चांगलाच हिसका दाखविला. या उपरही कारण नसताना गावात फिरताना दिसलात तर ‘काळ्या यादी’त टाकले जाईल व तुमचे पुन्हा भारतात येण्याचे दरवाजे कायमचे बंद होतील, अशी सक्त ताकीदही या पर्यटकांना देण्यात आली. हे पर्यटक इस्राइल, आॅस्ट्रेलिया, मेक्सिको व अन्य काही युरोपीय देशांतून आलेले आहेत. ‘लॉकडाऊन’मुळे ते येथील हॉटेलांमध्येच अडकून पडले आहेत. गावातील लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी ‘लॉकडाऊन’ सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत अंशत: शिथिल केले जाते.
तपोवन आऊट पोस्टचे पोलीस निरीक्षकविनोद कुमार यांनी सांगितले की, लॉकडाऊन शिथिल असते तेव्हा काही काम नसूनही गावात उगीचच फिरत असताना ‘मुनी की रेती’ भागातील तपोवन येथे हे १० विदेशी पर्यटक आढळले. लॉकडाऊन शिथिलकेल्याने फिरायला आलो, असे सांगितले. गावात असे विनाकारण फिरण्यासाठी ‘लॉकडाऊन’ उठविलेले नाही, याची समज देऊन त्यांच्याकडून वरीलप्रमाणे माफीनामा कागदांवर ५०० वेळा लिहून घेतला.१,५०० पर्यटक अडकलेउत्तराखंडच्या विविध भागांत सुमारे १,५०० विदेशी पर्यटक अडकले आहेत. आणखी ७०० विदेशी पर्यटकांना, त्यांच्या वकिलातींच्या मदतीने, गेल्या १५ दिवसांत मायदेशी परत पाठविण्यात आले, असे राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून सांगण्यात आले.