बनिहाल (जम्मू-काश्मीर) : बनिहाल रेल्वेस्थानकाजवळच्या हॉटेलमध्ये मुक्काम केलेले ब्रिटिश नागरिक रिचर्डस यांची माहिती न दिल्याबद्दल पोलिसांनी हॉटेलमालक अझाझ अहमद (रा. कासकूट खेडे) याला अटक करून गुन्हा दाखल केला.पोलीस अधिकाऱ्याने रविवारी दिलेल्या माहितीनुसार भारतीय दंडसंहितेचे कलम १८८ नुसार अहमद याच्यावर त्याने जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हॉटेलमध्ये मुक्कामाला राहणाºयांची (विशेषत: विदेशी लोक) माहिती कळवण्याच्या दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे, असा आदेश सर्व हॉटेल्समालकांना दिला गेलेला आहे.रिचर्डस हे १९ व २० मार्चच्या रात्री या हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. रिचर्डस हे काश्मीरला भेट देणार होते व प्रशासनाने कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी विदेशी नागरिकांवर प्रवेशबंदीचा आदेश १७ मार्च रोजीच जारी केला होता.रिचर्डस हे बनिहाल रेल्वेस्थानकाकडे काश्मीरला जाणाºया रेल्वेसाठी जाताना पोलिसांना दिसले. त्यांनी त्यांंना रामबन येथील जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेले व तेथून जम्मूला हलवले. खबरदारीचा उपाय म्हणून अधिकाºयांनी काश्मीरमधील बनिहाल आणि बारामुल्लादरम्यानची रेल्वे सेवा ३१ मार्चपर्यंत बंद केलेली आहे.
विदेशीची माहिती दडवली, हॉटेलमालकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 3:31 AM