८० फूट खोल विहिरीत पडलेल्या सिंहाच्या बछड्याला मोठ्या प्रयत्नांनंतर वाचवण्यात आले. गुजरातच्या गीर सोमनाथमध्ये ८० फूट खोल विहिरीत पडलेल्या दोन वर्षांच्या सिंहाच्या बछड्याला वाचवण्यासाठी वन विभागाचे सहा तास बचाव कार्य सुरू होते. त्यातील एक जण पिंजऱ्यात बसून विहिरीत उतरला व बऱ्याच प्रयत्नांनंतर त्याने बछड्याला वाचवून वर आणले. काही दिवसांपूर्वी सोमनाथ जिल्ह्यातच दोन वर्षांची सिंहीण ५० फूट खोल विहिरीत पडली होती. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन तासांच्या प्रयत्नांनंतर तिला वाचवून वर नेले होते.
विहिरीत पडलेला सिंहाचा बछडा वन विभागाने वाचवला
By admin | Published: July 11, 2017 1:52 AM